शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमळनेरमध्ये आजपासून सारस्वतांची मांदियाळी, ग्रंथ दिंडीस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 10:13 AM

1 / 6
जळगाव : साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर येथे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात आजपासून होत आहे.
2 / 6
त्यानिमित्त ग्रंथ दिंडीस सुरुवात झाली असून साहित्यिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
3 / 6
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत.
4 / 6
तसेच यावेळी साहित्यिकांसह दिग्गज मंत्री सुद्धा या साहित्य संमेलनास हजेरी लावणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या साहित्य संमेलनकडे लागले आहे.
5 / 6
सुमारे ७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अविस्मरणीय ठरावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
6 / 6
आज सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
टॅग्स :Amalnerअमळनेरakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ