जगातील सर्वात तरूण राष्ट्रप्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:55 PM2019-12-11T12:55:04+5:302019-12-11T13:00:17+5:30

गेल्या दोन दिवसांपूर्वी फिनलंडच्या पंतप्रधान म्हणून साना मरिन यांनी शपथ घेतली. तसेच, त्या सर्वात कमी वय असलेल्या पंतप्रधान आहेत. अशाच काही तरुण राष्ट्रप्रमुखांची माहिती आपण पाहूया....

फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन अवघ्या 34 वर्षांच्या आहेत. त्यांनी गेल्या मंगळवारी फिनलंडच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. एक तरुण महिला या देशाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे जगभरातून साना मरिन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होनारुक यांचे सुद्धा वय कमी आहे. ते 35 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म 7 जुलै 1984 रोजी झाला.

8 जानेवारी 1983 मध्ये जन्मलेले किम जोंग-उन यांनी वयाच्या 36 व्या वर्षी उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान झाले.

लॅटीन अमेरिकेतील अल साल्वाडोरचे अध्यक्ष म्हणून नायब बुकेले जून 2019 पासून विराजमान आहेत. 38 व्या वर्षी त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

हैतीचे पंतप्रधान म्हणून फ्रिट्स-विल्यम मिशेल यांनी वर्ष 2019 पासून पदभार सांभाळला. त्यांचा जन्म 23 जुलै 1980 असून पंतप्रधान असताना त्यांचे वय 39 होते.

कोस्टा रिकाचे अध्यक्ष कार्लोस अल्वाराडो क्विसाडा हश 2018 पासून पदाची सुत्रे सांभाळतात. त्यांनी 39 व्या वर्षी पदाभार स्वीकारला होता.