असं आहे दुबईत बांधलेलं जगातील सर्वात उंच हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 22:18 IST2018-09-10T22:09:43+5:302018-09-10T22:18:58+5:30

जगातील सर्वात उंच हॉटेलचा मान दुबई येथील गेवोरा हॉटेलकडे असून, सोन्यासारखे चमकणारे हे हॉटेल सुमारे 356 मीटर उंच आहे.

जगातील सर्वात उंच हॉटेलचा मान याआधी दुबईमधीलच जेडब्ल्यू मेरिएट मार्किसच्या नावे होता. गेवोरा हॉटेल या हॉटेलपेक्षा एका मीटरने उंच आहे.

या आलिशान हॉटेलमध्ये एकूण 528 खोल्या आहेत.

या हॉटेलमध्ये चार रेस्टॉरंट, ओपन एअर पूल आणि आणि हेल्थ क्लबसुद्धा आहे.