शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नासाने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट, पृथ्वीवरून उड्डाण करून थेट चंद्रावर उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 11:16 PM

1 / 5
अमेरिकन अंतराळ संस्था असलेल्या नासाने जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट तयार केले आहे. या रॉकेटच्या निर्मितीसाठीचा अंदाजित खर्च १.३५ लाख कोटी रुपये एवढा प्रचंड आहे. सध्या या रॉकेटच्या कोअर स्टेजची टेस्टिंग केली जात आहे. त्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्थेने या रॉकेटच्या चारही आरएसएस २५ इंजिनाला मिनिटांसाठी स्टार्टसुद्धा केले आहे.
2 / 5
सध्या नासाकडून या रॉकेटची चाचणी ही मिसिसिपी राज्यात असलेल्या स्टेनिस स्पेस सेंटर येथे सुरू आहे. यापूर्वी काही तांत्रिक कारणांमुळे या रॉकेटची चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. नासा माणसांशिवाय चंद्रावर जाण्याची तयारी करत आहे. या मोहिमेचे नाव आर्टेमिस असे ठेवण्यात आले आहे.
3 / 5
जगातील या सर्वात शक्तिशाली रॉकेटच्या माध्यमातून भविष्यामध्य सिंगल ट्रिपमध्ये चंद्रावर पोहोचण्याची योजना नासाने आखली आहे. नासाने विकसित केलेले स्पेस लॉंच सिस्टिम (एसएलसी) आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. परीक्षणाच्यादरम्यान रॉकेटचा मुख्य टप्पा सात सेकंदाच्या आत १.६ मिलियन पौंड्सपेक्षा अधिक शक्ती उत्पन्न करतो.
4 / 5
नासाने दिलेल्या माहितीनुसार एसएलएस हा इंजिनियरिंगच्या क्षेत्रातील एक अकल्पनीय पराक्रम आहे. हे अमेरिकेच्या पुढील पिढीमधील मोहिमांना शक्ती प्रदान करण्यास सक्षम असलेले एकमेव रॉकेट आहे. नासाचे अधिकारी प्रशासक स्टीव्ह जुर्स्की यांनी सांगितले की, आज एसएलएससाठी कोअर स्टेजची यशस्वी फायर चाचणी मानवाला चंद्रावर आणि त्याच्या पुढे घेऊन जाण्याच्या लक्ष्यामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे.
5 / 5
एसएलसी कोअर स्टेजमध्ये दोन प्रोपेलेंट टँक लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ७ लाख ३३ हजार गॅलनहून अधिक सुपरकुल्ड लिक्विड हायड्रोजन आणि लिक्विड ऑक्सिजन आहे. हे आरएस-२५ इंजिनाला इंधन देण्यामध्ये मदत करते. कोअर टप्प्यामध्ये उड्डाण सॉफ्टवेअर आणि एव्हियोनिक्स सिस्टिमचे एक गुंतागुंतीचे नेटवर्क आहे ज्याला प्रक्षेपण आणि उड्डाणाच्यादरम्यान रॉकेटला उडवण्यासाठी ट्रॅक करण्यासाठी आणि चालवण्यामध्ये मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
टॅग्स :NASAनासाUnited Statesअमेरिका