फॅशन की दुनिया, जगातील विचित्र नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 04:59 PM2019-09-25T16:59:55+5:302019-09-25T17:04:51+5:30

रूसमध्ये ईमो फॅशनची आवड असणारे किशोरवयीन मुलं जास्त प्रमाणात आत्महत्या करतानाचे दिसून आले. त्यानंतर ईमो फॅशन आणि त्याच्याशी निगडीत कपड्यांवर बंदी घालण्यात आली.

तुम्हाला जॉगिंग करण्याची आवड असली तरी बुरुंडीमध्ये तुम्ही जॉगिंग करू शकत नाही. मार्च 2014 मध्ये पूर्व आफ्रिकेच्या या देशातील राष्ट्रपतींनी जॉगिंग करण्यावर बंधन आणले. यामागचं कारण देताना राष्ट्रपती म्हणाले की, लोकं समाजविघातक कार्यांसाठी जॉगिंगची मदत घेतात.

ग्रीस सरकारने ऑनलाइन जुगारावर रोख लावण्यासाठी कॉम्प्युटर आणि मोबाइल फोनवर खेळण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक गेमवर बंदी घालण्यात आली आहे. ग्रीस सरकारला ऑनलाइन जुगार आणि व्हिडीओ गेममध्ये फरक करू शकत नसल्याचं नुकसान पर्यटकांना होतं. पर्यटकांना त्यांच्या मोबाइलमध्ये गेम ठेवल्यामुळे मोठा दंड भरावा लागतो किंवा तुरुंगात जावं लागतं.

उत्तर कोरियामध्ये तर असे अनेक विचित्र कायदे आहेत. तिथे निळ्या रंगाची जीन्स घालण्यावर बंदी आहे. पश्चिमी संस्कृतीपासून उत्तर कोरियाचा बचाव करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आल्याचं किम जोंगने सांगितलं.

मिलान जेव्हा ऑस्ट्रियामध्ये होते तेव्हा तिथे एक नियम तयार करण्यात आला होता. त्या नियमानुसार शहरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असणं गरजेचं आहे. फक्त अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात चेहऱ्यावर उदासिनता असेल तर दंड लागणार नाही.

टॅग्स :फॅशनfashion