लुनुगंगा म्हणजे अद्भुत चमत्कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:01 AM2019-08-30T11:01:43+5:302019-08-30T11:14:28+5:30

श्रीलंकेतील गॉल या शहराकडे जाताना रस्त्यात लुनुगंगा नावाचे ठिकाण लागते.

हे ठिकाण म्हणजे जगप्रसिद्ध वास्तुविशारद (आर्किटेक्ट )जेफ्री बावा यांनी साकारलेला एक सुंदर प्रकल्प.

१९१९ साली जन्मलेले जेफ्री बावा यांचे २०१९ हॆ वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून जेफ्री बावा ट्रस्ट कडून साजरे केले जात आहे.

खरं तर जेफ्री बावा हे व्यवसायाने आणि शिक्षणाने वकील. लंडनमधून वकिली शिक्षण घेऊन वकील झाल्यानंतर त्यांनी काही काळ वकिलीची प्रॅक्टिस केली.

मात्र, त्यांच्या लक्षात आले की, वकिली हे आपले क्षेत्र असले, तरी यात आपल्याला आनंद मिळणार नाही.

त्यानंतर त्यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी १९५७ मध्ये आर्किटेक्टची पदवी मिळविली. मग, त्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम करायला सुरुवात केली .

बघता बघता जेफ्री बावा आर्किटेक्ट म्हणून जगभरात नावारूपाला आले.

त्यांची अशी एक वेगळी स्टाईल होती. जेफ्री बावा यांची प्रयोगशाळा म्हणजे त्यांचे वीकएण्ड होम.

याठिकाणी गेल्यानंतर आणि येथील बेंटोटा नदी किनाऱ्याचे सौंदर्य पाहताना डोळे दिपून जातात.

निसर्गाची अद्भुत चमत्कार म्हणजे जेफ्री बावा यांचे हे घर म्हणजे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.

(सर्व फोटो : अनिल भापकर)