कोरोनाविरोधात ज्या औषधाचा झाला होता गवगवा, त्याच्याच वापरावर डब्ल्यूएचओनो आणली स्थगिती

By बाळकृष्ण परब | Published: November 20, 2020 04:51 PM2020-11-20T16:51:02+5:302020-11-20T16:58:28+5:30

corona virus News : कोरोना विषाणूवरील उपचारांमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत रेमडेसिवीर हे औषध प्रभावी मानले जात होते. मात्र आता हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर फारसे प्रभावी नसल्याचे समोर आले आहे.

कोरोना विषाणूवरील उपचारांमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत रेमडेसिवीर हे औषध प्रभावी मानले जात होते. मात्र आता हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर फारसे प्रभावी नसल्याचे समोर आले आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील Gilead Sciences च्या या औषधाबाबत आक्षेप घेत या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.

डब्ल्यूएचओच्या एक्स्पर्च पॅनेलने The BMJ या वैद्यकीय नियतकालिकाला सांगितले की, रेमडेसिविर है औषध रुग्णांवर कोणत्या प्रकारची सुधारणा करते याबाबतचे काही पुरावे सापडलेले नाही. एस्क्पर्ट पॅनेलने डब्ल्यूएचओच्या ग्लोबल ट्रायलचे रिझल्ट समोर आल्यानंतर या शिफारशी केल्या आहेत. डब्ल्यूएचओच्या या ग्लोबल ट्रायलला सॉलिडॅरिटी ट्रायल म्हटले जाते.

सॉलिडॅरिटी ट्रायलच्या निष्कर्षांमध्ये रेमडेसिविर औषध मृत्यूचे आकडे कमी करण्यामध्येही अयशस्वी ठरत असल्याचे दिसून आले आहे. एक्सपर्ट पॅनेलने तीन अन्य ट्रायलच्या आकड्यांचीसुद्धा समीक्षा केली. पॅनेलने सांगितले की, या औषधाचा रुग्णांवर काही खास प्रभाव दिसून आलेला नाही. सॉलिडॅरिटी ट्रायलचे ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित झाले होते.

दरम्यान, अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थद्वारे करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये हे औषध उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले होते. इंस्टिट्युटच्या म्हणण्यानुसार रेमडेसिवीर औषधाचा वापर रुग्णालयात दाखल रुग्णाच्या रिकव्हरीचा कालावधी पाच दिवसांपर्यंत कमी करू शकते. इन्स्टिट्युटच्या या दाव्यानंतर अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने या औषधाना मंजुरी दिली होती.

रेमडेसिवीर औषधावर डब्ल्यूएचओने केलेले विधान गिलियड सायन्ससाठी एक मोठा धक्का आहे. गिलियड सायन्सने डब्ल्यूएचओच्या ट्रायलवर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, एजन्सीने आतापर्यंत महत्त्वपूर्ण डेटा जारी केलेला नाही. त्यामुले याला अंतरमिम परिणामांची विश्वसनियतेचे मूल्यांकन करता येईल.

गिलियड सायन्सने एक पत्रक जारी करताना सांगितले की, अनेक अध्ययनामधून ही बाब समोर आली आहे की, रेमडेसिवीर औषध विषाणूविरोधात काम करते आणि रुग्णांचा रिकव्हरी टाइम कमी करते.

गिलियड सायन्सेसने सांगितले की, जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आणि डॉक्टर अॅटिव्हायरल उपचारांमध्ये रेमडेसिवीरच्या वापरावर सर्वप्रथम विश्वास ठेवत आहेत. अशा परिस्थिती डब्ल्यूएलचओचे दिशानिर्देश या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या जगभरातील सुमारे ५० देशांतील कोविड-१९ च्या रुग्णांना है औषध देण्यात आले आहे.

ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनासुद्धा कोरोनावरील उपचारांसाठी रेमडेसिवीरचे हे औषध देण्यात आले होते. मात्र डब्ल्यूएचओच्या एक्स्पर्ट्स पॅनेलने सांगितले की, त्यांच्या निष्कर्षांचा असा अर्थ होत नाही की रेमडेसिवीर औषध हे निरुपयोगी आहे. मात्र सद्यस्थितीत उपलब्ध आकड्यांच्या आधारावर कोरोनाच्या रुग्णांच्या प्रकृतीत या औषधामुळे कुठल्याही प्रकारचे सुधार होत असल्याचे पुरावे नाहीत.

Read in English