या निसर्गरम्य ठिकाणी झालं विराट-अनुष्काचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 22:20 IST2017-12-11T22:14:56+5:302017-12-11T22:20:02+5:30

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा विवाह सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विवाहामुळे इटली देशातील टस्कनी शहर प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे.

विराट आणि अनुष्कानं टस्कनीतल्या हेरिटेज रिसॉर्टमध्ये त्यांनी सात फेरे घेतले आहेत.

टस्कनीमध्ये नयनरम्य समुद्रकिनारे आणि चर्चही पाहायला मिळतात. इटलीतलं हे ठिकाण पर्यटनासाठी फारच महत्त्वाचं समजलं जातं.

टस्कनी हे शहर मध्य इटलीच्या मधोमध अपनाइन्स डोंगरावरून उत्तर-पूर्वकडून दक्षिण-पश्चिमेच्या दूरपर्यंत एड्रियाटिक समुद्राच्या किना-यापर्यंत पसरलेलं आहे.

आता विरुष्काच्या लग्नानंतर टस्कनी शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.