चक्क 'या' मुलीला भेटण्यासाठी दुबईच्या प्रिन्सला तिच्या घरी जावं लागलं, काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:20 PM2019-12-05T14:20:39+5:302019-12-05T14:23:45+5:30

अबू धाबी येथील क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जाएद अल नाह्यान यांना सोमवारी एका मुलीच्या घरी जाण्यास भाग पडलं. खरं तर, तो सौदी अरेबियाचा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन-सलमानसमवेत मंगळवारी दुबईत झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाला होता.

त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दोन्ही बाजूंनी मुलींनी रांगा लावल्या होत्या. एकीकडे सौदीचा क्राउन प्रिन्स सलमान भेटला होता, तर दुसरीकडे अबू धाबीचा क्राउन प्रिन्स अल नाह्यान फिरत होता. यावेळी एका मुलीने त्याच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला पण तो नकळत तेथून हलला. या घटनेचा व्हिडीओ नंतर व्हायरल झाला.

हा व्हिडीओ जेव्हा प्रिन्स अल नाह्यानने पाहिला. तेव्हा ते ती मुलगी आयशा मोहम्मद मशित अल मजुरीच्या घरी पोहोचला आणि तिला भेटला. व्हिडीओमध्ये आयशा सौदी राज्याचे राजकुमार मोहम्मद बिन सलमानच्या रांगेतून नाह्यानच्या दिशेने धावते. अल न्ह्यान त्या मुलीच्या जवळ येताच तो तिला न पाहताच पुढे सरकतो, तर मुलगी त्याला भेटायला पुढे सरसावते.

अल ह्यान पुढे गेल्यानंतर ती मुलगी निराश होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अल नाह्यान त्या मुलीच्या घरी गेले अन् तिची आणि कुटुंबांची भेट घेतली.

या भेटीनंतर अल न्ह्यान यांनी हे फोटो ट्विट केले. त्यांनी लिहिलंय की, "आज मी आयशाच्या घरी गेलो. तिच्या कुटूंबाला भेटून मला आनंद झाला.

टॅग्स :दुबईDubai