CoronaVirus: ...तर लॉकडाऊनचा कालावधी वाढणार; आणखी सहा महिने चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 03:28 PM2020-03-28T15:28:40+5:302020-03-28T15:43:21+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी केली.

कोरोनाता रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच मार्ग असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना घरातच राहण्याचं आवाहन केलं.

लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगची शिस्त पाळल्यास कोरोनावर मात करता येईल, असंदेखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोनाचा सामना करणाऱ्या अनेक देशांमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे.

चीनच्या वुहानमधून कोरोना जगभरात पसरला. वुहानमधील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीदेखील चीननं लॉकडाऊनचा पर्याय वापरला.

आता ब्रिटननंदेखील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि कोरोनाची बाधा पुन्हा होऊ नये म्हणून ब्रिटनमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ब्रिटनमध्ये १४ हजारपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ७५९ जणांचा मृत्यू झालाय.

ब्रिटनमधील लॉकडाऊन सहा महिन्यांनी वाढवला जाऊ शकतो, असं ब्रिटन सरकारच्या आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी म्हटलंय.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन सप्टेंबरमध्ये कायम ठेवला जाऊ शकतो, असं ब्रिटनच्या आरोग्य विभागाचे उपप्रमुख डॉ. जेन्नी हॅरिस यांनी म्हटलंय.