१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 22:51 IST2025-10-22T22:46:58+5:302025-10-22T22:51:31+5:30
Vnice City: हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेलं आहे. यापैकीच एक आहे इटलीतील व्हेनिस शहर. व्हेनिस शहर पाण्यामध्ये रोवलेल्या लाकडाच्या हजारो खांबांवर उभे आहे. या शहराची उभारणी करून हजारो वर्षे लोटली तरी शहरातील इमारती आणि त्यांच्या पायाशी असलेल्या लाकडाच्या खांबांना काहीही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे या शहराबाबत अनेकांच्या मनात कुतूहल आहे.

हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेलं आहे. यापैकीच एक आहे इटलीतील व्हेनिस शहर. व्हेनिस शहर पाण्यामध्ये रोवलेल्या लाकडाच्या हजारो खांबांवर उभे आहे. या शहराची उभारणी करून हजारो वर्षे लोटली तरी शहरातील इमारती आणि त्यांच्या पायाशी असलेल्या लाकडाच्या खांबांना काहीही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे या शहराबाबत अनेकांच्या मनात कुतूहल आहे.
व्हेनिस शहर एल्डर, पाईन, स्प्रूस, एल्म, लार्च आणि ओक यासारख्या लाकडाच्या खांबावर उभं करण्यात आलेलं आहे. ही लाकडं हराजो वर्षांपासून शहरातील दगडी महाल आणि उंच इमारतींचा डोलारा सांभाळत आहेत. या लाकडांची लांबी ३.५ मीटरपासून १ मीटरपर्यंत आहे.
व्हेनिस शहरातील लाकडाच्या पायाचं तंत्रज्ञान आपली बनावट, हजारो वर्षांपासून टिकून राहण्याची क्षमता रोमांचक आहे. या बांधकामाकडे इंजिनियरिंगचा अत्यंत अद्भूत उदाहरण म्हणून मानलं जातं. या बांधामामध्ये निसर्ग आणि फिकिक्सला उत्तम पद्धतीने वापर करण्यात आला आहे.
व्हेनिस शहरातील इमारतींचा पाया लाकडाच्या खांबांवर टिकावा यासाठी लाकडाचे खांब समुद्रतळापासून खाली गाडले जात असत. बांधकामाची प्रक्रिया बाहेरील भागापासून सुरू होईन मध्यभागापर्यंत जात असे. त्यात एक चौरस मीटर परिसरात ९ खांब गोलाकार पॅटर्नमध्ये रोवले जात असत. त्यानंतर त्यावर दगड कापून लावून सपाट भाग तयार केला जात असे. मग वर दगडी भिंतींचं बांधकाम केलं जात असे.
अनेक खांब जवळजवळ रोवले जात असत. तसेच समुद्र तळाची चिकट माती या खांबांना पकडून ठेवत असे. मातीच्या घर्षणामुळे हे लाकी खांब इमारतींना पकडून ठेवत असत. अशा बांधकामाची ही खूप प्राचीन पद्धत आहे.
व्हेनिसमधील इमारतीच्या पायाखाली वापरण्यात आलेले लाकडी खांब हजारो वर्ष झाली तरी अद्याप सडलेले नाहीत. त्याचं कारण म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेले खांब हे एल्डर आणि ओकसारख्या जलप्रतिरोधी झाडांपासून बनवलेले आहेत. हे खांब पाण्याखालील मातीत पुरलेले आहेत. माती आणि पाण्याचं मिश्रण ऑक्सिजनला दीर ठेवते. त्यामुळे कालौघात लाकूड अधिकाधिक कठोर होत जातं. तसेच ते कुजत नाही.
पहिल्या शतकातील रोमन इंजिनियर आणि वास्तुविशारद विट्रुवियस यानेही याच तंत्रज्ञानाचा उल्लेख केलेला होता. रोमन लोक पूल बांधण्यासाठी पाण्यात पुरलेल्या लाकडी खांबांचा वापर करक असत. चीनमध्येही वॉटर गेट्स याच पद्धतीने बनवले जात असत.