हे आहेत जगातील सर्वात धोकादायक तलाव, इथे जाणं म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूला निमंत्रणच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 20:53 IST2019-06-11T20:33:49+5:302019-06-11T20:53:14+5:30

या जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जाणं म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूला निमंत्रण ठरू शकतं. अशाच काही तलावांचा घेतलेला हा आढावा.
स्फोटक तलाव, कीव्ह
हा तलाव जगातील सर्वात धोकादायक तलावांपैकी एक आहे. कार्बन डाय ऑक्साइड आणि मिथेन वायूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथे स्फोट होत असतात.
रूपकुंड तलाव, हिमाचल
हिमाचल प्रदेशमधील रूपकुंड तलाव धोकादायक आहे. 1942 मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना येथे शेकडो मृतदेहांचे अवशेष आढळले होते. तेथे पोहण्यास मनाई आहे.
मिशिगन तलाव, अमेरिका
अमेरिकेतील मिशिगन तलाव हे जितके सुंदर आहे तितकेच धोकादायक आहे.
उकळता तलाव डोमिनिका
या तलावातील पाणी उकळत असते. या तलावाजवळ ज्वालामुखीचे क्रेटर असल्याने या तलावातील पाणी नेहमीच गरम असते.
कराचय तलाव, रशिया
रशियातील करायत तलाव हे अत्यंत विषारी तलाव आहे. इथे कुणी गेल्यास एका तासामध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो.