हे आहेत जगातील नव्याने उदयास आलेले काही देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 02:54 PM2020-01-27T14:54:49+5:302020-01-27T15:11:59+5:30

या जगाच्या पाठीवर सुमारे 200 हून अधिक देश आहेत. त्यापैकी अनेक देश हे शेकडो वर्षे जुने आहेत. तर काही देश हे हल्लीच जन्मास आले आहे. जाणून घेऊयात अशाच काही नव्या देशांविषयी

दक्षिण सुदान हा या जगातील सर्वात नवा देश आहे. 9 जुलै 2011 रोजी दक्षिण सुदान अस्तित्वात आला होता. अंतर्गत यादवी आणि राजकीय अस्थैर्यामुळे या देशातीत वातावरण बिकट आहे.

कोसोवो या देशाने 17 फेब्रुवारी 2008 रोजी सर्बियापासून परस्पर स्वातंत्र घोषित केले होते. मात्र हा देश अजूनही संयुक्त राष्ट्रांचा सदस्य झालेला नाही.

1991 मध्ये युगोस्लाव्हियाचे विघटन झाल्यानंतर सर्बिया आणि माँटेनिग्रो हा देश अस्तित्वात आला होता. मात्र 2006 मध्ये या देशाचे विभाजन होऊन सर्बिया आणि माँटेनिग्रो हे दोन देश अस्तित्वात आले.

20 मे 2002 रोजी इंडोनेशियापासून स्वतंत्र होऊन पूर्व तिमोर हा देश अस्तित्वात आला होता.

पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये 250 बेटांचा समूह मिळून हा देश बनलेला आहे. 21 हजार लोकसंख्या असलेल्या या देशाला 1994 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते.

1952 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एरिट्रिया हा इथिओपियातील स्वायत्त प्रांत घोषित केला. अखेरीस 1993 मध्ये इरिट्रियाने स्वातंत्र्य घोषित केले.

1 जानेवारी 1993 मध्ये झेकोस्लोव्हाकियाने संसद भंग केली. त्यामुळे दोन देश अस्तित्वात आले. ते देश म्हणजे झेक रिपब्लिक आणि स्लोव्हाकिया होय.