शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या आहेत जगातील सर्वात दुर्गम जागा, कुणी करू शकत नाही इथे जाण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 5:22 PM

1 / 12
सुमारे दोन लाख चौकिमी विस्तार असलेले थारचे वाळवंट भारत आणि पाकिस्तानमध्ये पसरलेले आहे. यातील बहुतांश भाग वालुकामय आहे. येथे वाळूचे मोठमोठे ढीग असून, ते वाहत्या वाऱ्यामुळे आपली जागा बदलत असतात.
2 / 12
चीनमध्ये असलेल्या ताकलामाकान वाळवंटाचा विस्तार सुमारे 2 लाख 70 हजार चौकिमी आहे. येथे मनुष्यवस्ती फार विरळ आहे.
3 / 12
अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये पसरलेल्या सोनोरन वाळवंटाचा विस्तार 3 लाख 10 हजार चौकिमी आहे.
4 / 12
अमेरिकेतील कोलोराडो पठाराचा विस्तार सुमारे 3 लाख 37 हजार चौकिमी आहे.
5 / 12
अमेरिकेतील सीरियन वाळवंटाचा विस्तार 4 लाख 92 हजार चौकिमी आहे.
6 / 12
पॅटागोनियन वाळवंट हे अर्जेंटिना आणि चिली या देशांमध्ये पसरलेले आहे. या वाळवंटाचे क्षेत्रफळ 6 लाख 20 हजार चौकिमी आहे.
7 / 12
दक्षिण आफ्रिकेत असलेल्या कालाहारी वाळवंटाचा समावेश जगातील सर्वात मोठ्या वाळवंटांमध्ये होतो. त्याचे क्षेत्रफळ 9 लाख चौकिमी इतका आहे.
8 / 12
चीन आणि मंगोलिया या देशांमध्ये पसरलेल्या गोबीच्या वाळवंटाचा विस्तार हा 10 लाख चौकिमी इतका आहे.
9 / 12
अरेबियन वाळवंट हे इराक, जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीराती आणि येमेन या देशांमध्ये पसरलेले आहे. या वाळवंटाचा विस्तार 23 लाख 30 हजार चौकिमी आहे.
10 / 12
सहारा महावाळवंट हे अल्जीरिया, चाड, इजिप्त, इरिट्रिया, लीबिया, माली, मोरिटानिया या देशात पसरलेले आहे.
11 / 12
आर्क्टिक प्रदेश अलास्का, कॅनडा, फिनलँड, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, रशिया आणि स्वीडन या देशांमध्ये पसरलेला आहे.
12 / 12
संपूर्ण बर्फाच्छादित असलेले अंर्टार्क्टिका खंड पूर्णपणे निर्मनुष्य आहे. काही संशोधक आणि हौशी पर्यटक वगळता सहसा इथे कुणीही जात नाहीत.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयEarthपृथ्वी