शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही आहेत जगातील सर्वात महागडी चलने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 3:08 PM

1 / 10
भारतासह जगभरातील बहुतांश चलनांचे मूल्यमापन हे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत केले जाते. त्यातून अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वात शक्तिशाली चलन असल्याचे दिसून येते. मात्र अमेरिकन डॉलरपेक्षाही काही चलने अधिक महागडी आहेत. अशाच चलनांचा हा आढावा.
2 / 10
स्विस फ्रँक हे सर्वात महागड्या चलनांपैकी एक आहे. एक स्विस फ्रँकसाठी 71.86 रुपये मोजावे लागतात.
3 / 10
अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वात मजबूत चलन मानले जाते. एका अमेरिकन डॉलरसाठी 70.89 मोजावे लागतात.
4 / 10
युरोपियन देशांनी एकत्र येत स्थापन केलेल्या युरोपियन युनियनचे युरो हे सामाईक चलन आहे. एका युरोसाठी 79.13 रुपये मोजावे लागतात.
5 / 10
ब्रिटनचे चलन पौंड्स महागड्या चलनांपैकी एक आहे. एका पौंड्ससाठी 91.86 रुपये मोजावे लागतात.
6 / 10
जिब्राल्टरचे चलन असलेले जिब्राल्टर पौंड्ससुद्धा बऱ्यापैकी महाग आहे. एका जिब्राल्टर पौंड्ससाठी 87.21 रुपये मोजावे लागतात.
7 / 10
लाटव्हिया या छोट्या देशाचे चलनसुद्धा बऱ्यापैकी महागडे आहे. एका लाटव्हिया लाटसाठी तब्बल 112.07 रुपये मोजावे लागतात.
8 / 10
ओमान या देशाचे चलन ओमान रियाल प्रचंड मजबूत आहे. एका ओमान रियालसाठी 184.42 रुपये मोजावे लागतात.
9 / 10
बहरीन या देशाचे चलन बहरीन दिनारसुद्धा बऱ्यापैकी महाग आहे. एका बहरीन दिनारसाठी 188.08 रुपये मोजावे लागतात.
10 / 10
कुवेत या देशाचे चलन कुवेत दिनार इतर चलनांपेक्षा फार महाग आहे. एका कुवेत दिनारसाठी 233.77 रुपये मोजावे लागतात.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय