शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे आहेत सर्वाधिक घनदाट जंगले असलेले आघाडीचे दहा देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 4:30 PM

1 / 11
हिरवळीने नटलेली जंगले ही पर्यावरणाचे पंचप्राण असतात. ज्या भागात जंगलांची दाटी असते तिथे प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. आज आपण पाहूया सर्वाधिक घनदाट जंगले असलेले जगातील आघाडीचे दहा देश.
2 / 11
सर्वाधिक घनदाट जंगले असलेल्या पहिल्या दहा देशांच्या यादीत आपला भारत देश दहाव्या स्थानी आहे. भारतात सुमारे 8 लाख 02 हजार 088 चौकिमी प्रदेश वनाच्छादित आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 23.68 टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे.
3 / 11
अनेक बेटांनी बनलेला इंडोनेशिया हा देश वनसंपत्तीने समृद्ध आहे. येथील 8 लाख 84 हजार 950 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे. इंडोनेशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 46.46% क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे.
4 / 11
दक्षिण अमेरिकेमधील अर्जेंटिना या देशातील एकूण 9 लाख 45 हजार 336 क्षेत्र वनांनी आच्छादलेले आहे. हे क्षेत्र देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 34% एवढे आहे.
5 / 11
आफ्रिका खंडातील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशातील एकूण 11 लाख 72 हजार 704 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे.
6 / 11
ऑस्ट्रेलियामधील 14 लाख 70 हजार 832 चौकिमी क्षेत्र वनांनी आच्छादलेले आहे.
7 / 11
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असा लौकिक असलेल्या चीनमध्येही मोठे क्षेत्र वनाच्छादित आहे. चीनमधील 20 लाख 83 हजार 210 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे.
8 / 11
अमेरिकेमधील मोठे क्षेत्र वनांनी आच्छादलेले आहे. अमेरिकेच्या एकूण भूभागापैकी 32 लाख 00,950 चौकिमी क्षेत्रावर वने आहेत.
9 / 11
अॅमेझॉनच्या दुर्गम परिसरासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्राझीलमध्ये एकूण 49 लाख 16 हजार 438 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे.
10 / 11
कॅनडा हा देश वन्यसंपत्तीने समृद्ध असून येथील 49 लाख 16 हजार 438 चौकिमी क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे.
11 / 11
क्षेत्रपफाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश असलेल्या रशियाकडे जगातील सर्वाधिक वनसंपदा आहे. रशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 81 लाख 49 हजार 300 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे.
टॅग्स :forestजंगलenvironmentपर्यावरणIndiaभारतTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन