आश्चर्य! 'या' देशांमध्ये एकही नदी नाही; तरीही आहेत संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 03:16 PM2020-04-07T15:16:04+5:302020-04-07T15:28:38+5:30

नदी म्हटलं की गाव आलंच, बऱ्याचदा आपण गावातून वाहणाऱ्या मोठमोठाल्या नद्या पाहिल्याच आहेत. गावाच्या जवळ नदी असल्यास तो प्रदेश संपन्न समजला जातो. भौगोलिक परिस्थितीवर बऱ्याचदा त्या भागाची प्रगती अवलंबून असते. जगभरात अनेक देश आहेत, जिथे नद्याच नाहीत, तरीसुद्धा ते देश अस्तित्व टिकवून आहेत. बेटांवर आणि वाळवंटात असे अनेक देश उभे राहिलेले आहेत. अशाच काही देशांची माहिती जाणून घेऊयात...

खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांमुळे कतारला अनन्यसाधारण असं महत्त्वं आहे. मध्य पूर्वेतल्या अरबी बेटावर वसलेला हा छोटासा देश असून, दक्षिणेकडे सौदी अरेबिया अन् इतर बाजूस इराणचं आखात आहे. विशेष म्हणजे कतारमध्ये एकही नदी सापडणार नाही.

ओमान प्राचीन वारसा आणि संस्कृतीनं परिपूर्ण असा देश आहे. जवळपास ८ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात राजधानी मस्कतला सगळ्यात स्वच्छ आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं. जगातल्या मोठ्या बंदरांपैकी एक बंदर हे ओमानमध्ये आहे.

प्रशांत महासागरात एकूण ३३ बेट आहेत आणि त्यापैकी जवळपास २१ बेटांवर लोकवस्ती आहे. प्रशांत महासागरातला किरीबाती हासुद्धा एक छोटासा देश आहे. या देशातही नदी पाहणं दुर्मीळ असून, हा समुद्रानं वेढलेला आहे.

तेलामुळे सौदी अरेबियाला महत्त्व प्राप्त झालं आहे. मक्का आणि मदिना ही प्रमुख धार्मिक स्थळेसुद्धा इथेच आहेत. सौदी अरेबिया हा देश श्रीमंत असून, या देशाला जागतिक स्तरावर मान आहे.

कुवैत हा देशसुद्धा खजिन तेलानं स्वयंपूर्ण आहे. १९६१मध्ये हा देशाला स्वातंत्र्य मिळालं असून, शेजारील इराणकडून बऱ्याचदा या देशावर आक्रमण होत असते. अमेरिकेच्या पाठबळामुळेच कुवैत हा देश उदयास आला आहे.

सात राज्यांनी मिळून तयार झालेला देश म्हणजे यूएई. मध्य पूर्वेतला हा सर्वात प्रगतीशील देश असून, १९७१मधे तत्कालीन राष्ट्रपती शेख झायेद यांनी आजूबाजूची राज्यं एकत्र करून ह्या राष्ट्राची पायाभरणी केली. अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या सात राज्यांचं मिळून संयुक्त अरब अमिराती बनलेलं आहे. संयुक्त अरब अमिरातीतही तेलाचे साठे असल्यानं त्याला जागतिक स्तरावर महत्त्वं आहे. दुबई आणि अबु धाबीमुळे संयुक्त अरब अमिरातीचं नाव जगभरात पोहोचलेलं आहे.

कोमोरोस हा आफ्रिका खंडातला तिसरा सगळ्यात छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ या काळात कोमोरोस ही फ्रान्स या देशाची वसाहत होती. १९७५मध्ये याला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळालं. देशातली अर्ध्याहून अधिक जनता हलाखीत जीवन जगत आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात लहान देश म्हणजे मोनॅको आहे. फक्त दोन चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा देश असून, लोकसंख्या ३३००० एवढी आहे. मोनॅको हा देश इटलीला लागून आहे, तसेच इथे मोठ्या प्रमाणात लोक धनाढ्य आहेत.

ख्रिश्चन धर्मगुरु पोप यांचं निवासस्थान वॅटिकन सिटीमध्ये असून, हा ४४ हेक्टर क्षेत्रफळात विस्तारलेला युरोपमधला हा छोटासा देश आहे. व्हॅटिकन सिटी इटलीमधील रोममध्ये असून, त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली आहे.

मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा देश आहे. मनामा ही बहरीन देशाची राजधानी आहे. कतार आणि सौदी अरेबियाच्या मधोमध वसलेला बहरीन हा देश ३३ बेटांनी मिळून निर्माण झाला आहे. बहरीन हा अरब देशांमधला सगळ्यात छोटा देश आहे. सगळ्यात जास्त उष्णता असलेला देश म्हणून बहरीनची ओळख आहे. ४०० वर्ष जुना असलेला मौसकुट हे इथला झाड खुप प्रसिद्ध आहे. ज्याला इथं 'ट्री ऑफ लाईफ' असंही म्हणतात.