भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:22 IST2025-12-18T11:17:27+5:302025-12-18T11:22:22+5:30

युद्ध अन् जागतिक निर्बंधानंतरही रशिया आज जगातील ताकदवान देशांपैकी एक आहे. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांची धोरणे आणि रशियाच्या सैन्य क्षमतेवर जगाचे लक्ष लागून असते. त्यातच रशियातील लोकसंख्येच्या आकडेवारीबाबत नवीन दावा समोर आला आहे. ज्यामुळे तिथल्या धार्मिक संतुलनात बदलाचे संकेत मिळत आहेत.

प्यू रिसर्च रिपोर्टनुसार, रशियाच्या लोकसंख्येत मुस्लीमांची संख्या सातत्याने वाढत आहे तर हिंदू समुदायाची संख्या मर्यादित होत आहे. हा बदल येणाऱ्या काळात रशियातील अंतर्गत स्थितीच बदलणार नाही तर त्याचा सामाजिक आणि राजकीय दिशा ठरवण्यावरही प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

रशियाची एकूण लोकसंख्या १४ ते १५ कोटी इतकी आहे. त्यात मुस्लीम समुदायाची टक्केवारी जवळपास ७ ते १० टक्क्यांच्या आसपास मानली जाते. त्याचा अर्थ रशियात आजच्या घडीला २.५ कोटी मुस्लीम नागरिक राहत आहेत.

परंतु रशियाच धर्माच्या आधारे जनगणना होत नाही. त्यासाठी हे आकडे विविध रिसर्च आणि रिपोर्टच्या आधारे आहेत. रिसर्चनुसार अलीकडच्या काळात रशियात वेगाने वाढणाऱ्या धर्मांमध्ये इस्लामचा समावेश आहे. त्यातून येणाऱ्या काळात मुस्लिमांची संख्या आणि त्यांचा वाटा आणखी वाढू शकतो.

रशियातील धार्मिक नेते आणि काही रिपोर्टनुसार, पुढील १० ते १५ वर्षांत रशियाच्या लोकसंख्येतील एका मोठा भाग मुस्लीम समुदायाचा असू शकतो. या प्रतिक्रियांमुळे रशियात लोकसंख्या नियंत्रणावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा अंदाज अतिरेक होऊ शकतो परंतु मुस्लीम लोकसंख्या वेगाने वाढतेय हे नाकारले जाऊ शकत नाही असं विश्लेषक सांगतात.

रशियात मुस्लीम लोकसंख्या वाढण्यामागे सर्वात मोठे कारण मध्य आशियाई देशातून होणारे स्थलांतरण आहे. उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान आणि कजाकिस्तानसारख्या देशातून मोठ्या संख्येने लोक रोजगार आणि इतर उत्पन्नाच्या शोधून रशियाला पोहचत आहेत.

यातील अनेक स्थलांतरित कित्येक वर्षापासून रशियात राहत आहेत आणि ते कायम स्वरुपी तिथे स्थायिक झाले. त्यासोबतच रशियातील काही क्षेत्रात याआधी मुस्लीम राहत होते. जिथे अपेक्षापेक्षा अधिक जन्मदर आहे. याठिकाणचाही आकडा मुस्लीम लोकसंख्या वाढीवर परिणामकारक आहे.

रशियातील काही भागात मुस्लीम समुदाय मोठ्या संख्येने आहे. तातरस्तान, चेचन्या आणि दागेस्तानसारख्या परिसरात मुस्लीम बहुल लोकसंख्या आहे. त्याशिवाय मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गसारख्या मोठ्या शहरातही स्थलांतरित मुस्लीम लोकसंख्या वेगाने वाढत आहे.

काही रिपोर्टमध्ये २०३० पर्यंत रशियात मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश होऊ शकते असं म्हटले आहे. तर काही विश्लेषकांचा दावा आहे की हे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, कारण रशियातील लोकसंख्या मर्यादित आहे. मात्र येणाऱ्या काळात लोकसंख्येत बदल स्पष्टपणे दिसून येतील असं म्हटलं जाते.

सध्याच्या स्थितीत रशियात ईसाई धर्माला मानणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. अंदाजानुसार, जवळपास निम्मी लोकसंख्या ईसाई परंपरा मानणारी आहे. परंतु कमी जन्मदर आणि घटत्या लोकसंख्येमुळे ईसाई समुदायाची भागीदारी हळूहळू कमी होत आहे. रशियात हिंदू अल्प प्रमाणात आहे. इथल्या एकूण लोकसंख्येच्या नगण्य हिंदू आहेत. बौद्ध धर्माला मानणारे लोकही रशियात राहतात. त्याशिवाय एक मोठा गट कुठल्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. कारण त्यांच्यावर सोवियत काळाचा धर्मनिरपेक्ष प्रभाव आहे.