शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हाईट हाऊसमधील भाषणात मोदींना आठवले 'ते' दिवस, ३० वर्षांपूर्वीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 10:02 PM

1 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वीत ते अमेरिकेत गेले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
2 / 10
मोदींच्या दुसऱ्या अधिकृत दौऱ्यावेळी जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. बायडन यांनी मोदींना विशेष निमंत्रण दिले होते. त्यामुळे, व्हाईट हाऊसमध्ये मोदींचे स्वागतही तितक्यात खास पद्धतीने झाले.
3 / 10
मोदींनी व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्यांना ३० वर्षांपूर्वीचे जुने दिवस आठवले. जेव्हा मोदींनी व्हाईट हाऊसबाहेर उभे राहून फोटो काढला होता. तेव्हा ते भाजपचे प्रचारक होते.
4 / 10
व्हाईट हाऊसमध्ये भाषण करताना मोदींनी म्हटले की, मी सर्वात आधी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी केलेल्या स्वागतासाठी मनापासून धन्यवाद देतो. आज व्हाईट हाऊसमध्ये जबरदस्त स्वागत केले हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे.
5 / 10
त्या सन्मानासाठी मी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि जिल बायडन यांचे आभार मानतो. ३ दशकापूर्वी सर्वसामान्य नागरिक म्हणून US ला आलो होतो, तेव्हा व्हाईट हाऊस केवळ बाहेरून पाहता आले.
6 / 10
यावेळी पहिल्यांदाच व्हाईट हाऊसचे दरवाजे इतक्या मोठ्या संख्येने भारतीय अमेरिकनसाठी उघडण्यात आले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरुवात करत मने जिंकली.
7 / 10
अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान आज वॉश्गिंटन डीसीत होते. मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसला पोहचले. याठिकाणी मोदींचे भव्यदिव्य स्वागत झाले.
8 / 10
व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि बायडन प्रशासन यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. पंतप्रधान मोदींचे बायडन दाम्पत्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी व्हाईट हाऊसमध्ये संगीत समारंभही आयोजित करण्यात आला होता.
9 / 10
नरेंद्र मोदी हे १९९३ साली अमेरिकेत फिरण्यासाठी आले होते. मोदींनी त्यांच्या याच अमेरिकेतील पर्यटन प्रवासाची आठवण सांगितली. तसेच, पंतप्रधान झाल्यानंतर अनेकदा आपण व्हाईट हाऊसला आल्याचेही त्यांनी म्हटले.
10 / 10
मोदी आपल्या मित्रांसमवेत व्हाईट हाऊसच्या बॉर्डरवर होते. त्यावेळी, मित्रांसमवेत मोदींनी फोटोही काढला होता. तो फोटो पंतप्रधा नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर व्हायरल झाला होता.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाprime ministerपंतप्रधानJoe Bidenज्यो बायडन