शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अग्निकल्लोळ! Texas च्या जंगलात भीषण आग; शेकडो प्राण्यांचा मृत्यू, हजारो घरं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 1:39 PM

1 / 13
अमेरिकेतील टेक्सासमध्ये जंगलात आग वेगाने पसरत आहे. मोठ्य़ा प्रमाणात घरं जळून खाक झाली आहेत. गुरांचे गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. आग इतकी भीषण होती की रस्त्यावरील लँपही वितळून गेला आहे. (फोटो: रॉयटर्स)
2 / 13
आग इतकी वेगाने पसरली की लोकांना आपली मालमत्ता वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. वाहने जळून खाक झाली आहेत. (फोटो: रॉयटर्स)
3 / 13
या आगीला स्मोकहाउस क्रीक फायर म्हणतात. यात सुमारे 3380 चौरस किलोमीटर क्षेत्र जळून राख झाले आहे. या आगीने शेजारच्या ओक्लाहोमाचा काही भागही जळून खाक झाला आहे. (फोटो: एपी)
4 / 13
आतापर्यंत केवळ तीन टक्के आग विझवण्यात यश आले आहे. ही आग खूप भयानक आहे कारण वारा खूप वेगाने वाहत आहे. आग पूर्णपणे विझण्याआधी मोठ्या क्षेत्राला जाळून राख करेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. (फोटो: एपी)
5 / 13
यापूर्वी 2006 मध्ये पूर्व अमारिलो कॉम्प्लेक्स फायरनमुळे 3630 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र जळून खाक झाले होते. ज्यामध्ये जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत आहे. सर्वत्र धूर पसरत आहे. (फोटो: रॉयटर्स)
6 / 13
धुरामुळे हवाई सर्वेक्षणही केले जात नाही. बचाव कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, एवढा धूर आहे की एका पॉईंटनंतर आम्हाला काहीच दिसत नाही. अशा स्थितीत परतावे लागते. मृत महिलेचे कुटुंबीय सध्या तिचा शोध घेत आहेत. (फोटो: रॉयटर्स)
7 / 13
परिसरात आतापर्यंत सुमारे 40 घरं जळून खाक झाली आहेत. शेकडो प्राण्यांचा मृत्यू झाला. कारण ते पळून जाऊ शकत नव्हते. आगीने त्यांचा परिसर व्यापला होता. या आगीत मोठं नुकसान झालं आहे. (फोटो: रॉयटर्स)
8 / 13
अनेक जनावरांचे मृतदेह शेतात पडून आहेत. यापूर्वी 2014 मध्ये अमारिलोच्या उत्तरेकडील फ्रिच परिसरात लागलेल्या आगीत शेकडो घरं नष्ट झाली होती. सध्या 40 ते 50 घरे जळून खाक झाली आहेत. (फोटो: रॉयटर्स)
9 / 13
आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. पण वारे जोरदार आहेत. तापमानात अवेळी वाढ झाली आहे. त्यामुळे आग पसरत आहे. (फोटो: एपी)
10 / 13
बोर्जर परिसरातील 13 हजार लोकांना आपलं घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं आहे. या भागातील नागरिकांनीही तयारी केली आहे. काही लोकांनी तर घरंही सोडली आहेत. (फोटो: एपी)
11 / 13
सध्या या भागात ताशी 72 किमी वेगाने वारे वाहत आहेत. ज्याचा कमाल वेग 113 किमी/ताशी गेला. त्यामुळे आग वेगाने पसरली आणि मोठ्या परिसरात पसरली. (फोटो: एपी)
12 / 13
(फोटो - एपी)
13 / 13
(फोटो - एपी)
टॅग्स :fireआग