युरोपमधले दहशतवादी हल्ले
By admin | Updated: November 14, 2015 00:00 IST2015-11-14T00:00:00+5:302015-11-14T00:00:00+5:30

७ जानेवारी २०१५ प्रॉफेट मोहम्मद यांची कार्टून छापणा-या फ्रान्समधल्या चार्ली हेबदो या मासिकाच्या पॅरीसमधल्या कार्यालयावर अल कायदाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला यामध्ये १२ जण ठार झाले.
२४ मे २०१४ ब्रसेल्समधल्या ज्यूंच्या म्युझियमवर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ४ जण ठार झाले.
२२ मे २०१३ लंडनमध्ये भररस्त्यावर ली रिग्बी या सैनिकाची अल कायदापासून प्रेरणा घेतलेल्या दहशतवाद्यांनी चाकूनी भोसकून हत्या केली.
मार्च २०१२ दक्षिण फ्रान्समध्ये ओझर हाथोरा ज्यूईश स्कूलमध्ये अल कायदाच्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये ३ विद्यार्थी तीन सैनिक व एक धर्मगुरू ठार झाले.
२२ जुलै २०११ मुस्लीमविरोधी माथेफिरू आंद्रे ब्रेव्हिकने ओस्लोमध्ये बाँब पेरला आणि नंतर एका शिबिरामध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तब्बल ७७ जणांनी प्राण गमावले.
११ मार्च २००४ स्पेनमध्ये माद्रिद येथे अत्यंत गर्दीच्या वेळी ट्रेनमध्ये बाँबस्फोट घडवण्यात आला. यामध्ये १९१ प्रवासी ठार झाले.
७ जुलै २००५ लंडनच्या सबवे ट्रेनमध्ये अल कायदाच्या आत्मघातकी पथकाने केलेल्या बाँबस्फोटामध्ये ५७ जणांनी प्राण गमावले.
१४ नोव्हेंबर २०१५ फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये आत्मघातकी दहशतवाद्यांनी सात ठिकाणी बाँबस्फोट घडवले. फ्रान्स व जर्मनी यांच्यात फ्रेंडली सामना सुरू असताना स्टेडियमच्या जवळच स्फोटाचे धमाके झाल्यावर प्रेक्षकांनी जीवाच्या भीतीने मैदानात धाव घेतली. या हल्ल्यांमध्ये १५० पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत.