दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स ठरली मिस युनिव्हर्स 2017!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 15:52 IST2017-11-27T15:50:04+5:302017-11-27T15:52:51+5:30

मिस युनिव्हर्स 2017 चा किताब दक्षिण आफ्रिकेकडे गेला आहे. डेमी नेल पीटर्सही यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती ठरली आहे.

लासवेगासमध्ये झालेल्या सोहळ्यात मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला विजेती घोषीत करण्यात आलं.

दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल पीटर्सला मिस जमाईका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाचं लौरा गोन्जालेज तगड आव्हान होतं.

मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करायला दुनियाभरातून 92 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. पण अंतिम फेरीत फक्त आफ्रिका, जमाईका आणि कोलंबियाने मजल मारली.