By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:54 IST
1 / 7एआयच्या स्मार्ट ग्लासेसमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा बदल होऊ घातला आहे. मेटाच्या Ray-Ban स्मार्ट ग्लासला नेक्स जनरेशनचं तंत्रज्ञान म्हटलं जात आहे. मात्र याच ग्रासेसबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रायव्हसीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 2 / 7एका रिपोर्टनुसार मेटा रे-बॅन स्मार्ट ग्रासेसच्या माध्यमातून रेकॉर्ड होणाऱ्या काही व्हिडीओ क्लिप त्रयस्त व्यक्तीही पाहत आहेत. म्हणजेच जे लोक ही स्मार्ट ग्लास वापरत आहेत, ते सुद्धा पाळतीचा भाग बनू शकतात. 3 / 7२७ फेब्रुवारी रोजी स्वीडनमधील एका वृत्तपत्राने पडताळणी करून दिलेल्या वृत्तानुसार मेटा आणि रे-बॅन यांच्यामधील भागीदारी आणि त्यांच्या एआय ग्लासेसच्या काम करण्याच्या पद्धतीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये या ग्लासेसमध्ये रेकॉर्ड होणारं चित्रिकरण अनेक लोकांपर्यंत पोहोचत असल्याचं उघडकीस आलं. त्यामध्ये एआयला ट्रेन करणाऱ्या ह्युमन ट्रेनरचाही समावेश होता. 4 / 7केनियामधील नैरोबी येथील एका कंपनीशी संबंधित काही सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने सांगितले की, आम्ही असे व्हिडीओ पाहिले आहेत की, ज्यामध्ये लोक आपल्या अत्यंत खाजगी आणि संवेदनशील स्थितीमध्ये दिसत आहे. 5 / 7या वृत्तामध्ये अशा काही व्हिडीओंचाही उल्लेख आहे, ज्यामध्ये कपडे बदलणाऱ्या पार्टनरसोबतचे काही खाजगी क्षण चित्रित झालेले आहेत. तसेच हे व्हिडीओ मेटामध्ये ट्रेनिंगच्या नावावर ह्युमन मॉडरेटरसुद्धा पाहत आहेत. खरंतर अशा क्षणी कॅमेरे सुरू राहणं मेटाचे स्मार्ट ग्लास परिधान करणाऱ्या कुणालाही आवडणारं नाही. 6 / 7मेटाने रे-बॅनसोबत मिळून हे स्मार्ट ग्लास तयार केले आहेत. तसे पाहिले तर हे सन ग्लास दिसायला सामान्य वाटतात. मात्र त्यामध्ये लहान कॅमेरे, मायक्रोफोन आणि स्पीकर लावलेले आहेत. 7 / 7युझर या ग्लासच्या मदतीने फोटो आमि व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात. तसेच लाईव्ह स्ट्रीम करू शकतात.