शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मला आणि कुटुंबीयांना वाचवा...; १३ वर्षांपूर्वी बायडेन यांना वादळातून वाचवणाऱ्या अफगाणीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 1:58 PM

1 / 7
अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपलं सैन्य पूर्णपणे माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी अमेरिकेची मोहीम पूर्ण झाली. अमेरिकेनं आपल्या नागरिकांना आणि सैनिकांना सुरक्षित अफगाणिस्तानातून बाहेर काढलं. परंतु आताही अफगाणिस्तानात असे काही लोक आहेत जे अमेरिकेकडे मदतीची विनवणी करत आहेत.
2 / 7
यापैकी एक व्यक्ती अशीही आहे जिनं १३ वर्षांपूर्वी हिमवादळात ३० तास उभं राहून जो बायडेन यांना बाहेर काढण्यात मदत केली होती. २००८ मध्ये अफगाणिस्तानच्या बर्फाळ पर्वतांमध्ये अडकलेल्या तत्कालीन सिनेटर जो बायडेन यांना परत आणण्यात मदत करणाऱ्या अफगाण व्यक्तीला मागे सोडण्यात आलं आहे आणि आता ते व्हाईट हाऊसकडे मदतीसाठी विनंती करत आहेत.
3 / 7
अमेरिकेने आपलं मिशन पूर्ण झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अनेक अफगाण सहकाऱ्यांना त्यांच्या स्थितीत सोडलं आहे. यापैकी एक अफगाण अनुवादक मोहम्मद आहेत, ज्यांनी २००८ मध्ये हिमवादळात अडकलेल्या जो बायडेन यांच्या बचाव कार्यात मोठी भूमिका बजावली होती. मोहम्मद यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलशी संवाद साधला.
4 / 7
''हॅलो मिस्टर प्रेसिडेंट, मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवा. मला इथे विसरू नका. मी इथे भीतीदायक वातावरणात आहे आणि मी घर सोडण्यासही तयार आहे,' असं ते म्हणाले. दरम्यान, मोहम्मद यांनी त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांचं खरं नाव उघड केलं नाही.
5 / 7
मोहम्मद सध्या एका ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसोबत लपले आहेत. २००८ मध्ये जेव्हा हेलिकॉप्टर हिमवादळामुळे अफगाणिस्तानमधील दुर्गम दरीत उतरलं होतं तेव्हा ते तत्कालिन सीनेटर जो बिडेन आणि माजी सिनेटर चक हेगेल, आर-नेब, जॉन केरी, डी-मास यांना वाचवण्यात मदत करणाऱ्या टीमचा एक भाग होते. मोहम्मद यांच्यासोबत काम करणाऱ्या लष्कराच्या जवानांच्या मते ते त्यावेळी अमेरिकन सैन्यासाठी अनुवादक होते.
6 / 7
दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलनुसार याची माहिती जो बायडेन यांच्यापर्यंत पोहोचली असून व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव झेन साकी यांनी अमेरिका त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अफगाणिस्तानातून काढण्यासाठी वचनबद्ध असल्याचं म्हटलं.
7 / 7
'आम्ही तुम्हाला त्या ठिकाणाहून बाहेर काढू आणि तुमच्या सेवेचा सन्मान करू. आम्ही असं करण्यासाठी वचनबद्ध आहोत,' असं साकी म्हणाले. मोहम्मद यांनी आपल्या वयाच्या ३६ व्या वर्षी जो बायडेन यांची मदत केली होती. अफगाणिस्तानात २० वर्षांच्या कालावधीत अमेरिकन सैन्याला मदत करणाऱ्यांपैकी अनेक जण सध्या तालिबानच्या भीतीच्या वातावरणात जगत आहेत.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्षJoe Bidenज्यो बायडनTalibanतालिबान