शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia vs Ukraine War: रशियन सैन्यासोबत असलेल्या 'त्या' ट्रक्समध्ये दडलंय काय? पुतीन यांचा थरकाप उडवणारा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:04 PM

1 / 8
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटलं आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनची वाताहत होत आहे. कालपासून सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी इशारे देऊन, निर्बंध लादूनही रशिया युद्ध थांबवण्यास तयार नाही.
2 / 8
बलाढ्य रशियासमोर युक्रेनचा निभाव लागणार नाही याची संपूर्ण जगाला कल्पना आहे. रशियाचा निषेध करणारी, रशियाला इशारा देणारी अमेरिका आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास युक्रेनला होता. मात्र तो फोल ठरला. त्यामुळे रशियासमोर आता युक्रेन एकाकी पडला आहे.
3 / 8
युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियन सैन्यानं अनेक शहरांवर हल्ले चढवले. त्यात युक्रेनचं मोठं नुकसान झालं. तर रशियाचे १००० सैनिक मारल्याचा दावा युक्रेननं केला आहे. त्यामुळे रशियाचंही नुकसान होत असल्याची माहिती समोर येत आहे.
4 / 8
युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी गेलेल्या रशियन सैन्यासोबत मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री, अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आहेत. त्यासोबतच रशियन सैन्याकडे काही भलेमोठे ट्रक आहेत. या ट्रकबद्दल अतिशय गुप्तता पाळण्यात आली आहे. टेलिग्राफसह अन्य वृत्तसंस्थांनी याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
5 / 8
रशियन सैन्यासोबत असलेल्या भल्यामोठ्या ट्रकमध्ये अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. थोडक्यात हे ट्रक म्हणजे चालत्या फिरत्या स्मशानभूमी आहेत. मृत सैनिकांच्या अंत्यविधीसाठी या ट्रकचा वापर करण्यात येणार आहे.
6 / 8
जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरले जाणारे ट्रक सध्या रशियन सैन्यासोबत आहेत. हेच ट्रक सैनिकांना संपवण्यासाठी वापरले जाऊ शकतात, अशी भीती ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॅलेस यांनी व्यक्त केली.
7 / 8
युक्रेनविरुद्धच्या लढाईतील मृतांचा खरा आकडा लपवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. युक्रेनविरुद्ध लढाईची घोषणा केल्यानंतर रशिया युद्धात आपले जुने डावपेच वापरेल, असं वॅलेस म्हणाले. रशियानं याआधीही अशा प्रकारच्या चालत्या फिरत्या स्मशानभूमी सैन्यासोबत तैनात केल्या होत्या, याची आठवण त्यांनी करून दिली.
8 / 8
युद्धात देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांवर अशा प्रकारे चालत्या फिरत्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणं धक्कादायक आहे. रशिया आपल्या सैन्याकडे काय म्हणून पाहतो, हे यातून दिसतं, असं वॅलेस म्हणाले. युद्धात झालेली मनुष्यहानी लपवण्यासाठी रशिया ट्रकमध्ये असलेल्या स्मशानभूमीचा वापर करतो.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन