Russian-Ukraine War: रशियन सैनिक मिटवत आहेत त्यांच्या वाहनांवरील 'Z' चिन्ह? जाणून घ्या याचा अर्थ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 05:27 PM2022-04-19T17:27:07+5:302022-04-19T17:35:47+5:30

Russia using 'Z' Symbol in War: यूक्रेनियन मीडियानुसार, रशियन सैनिक मिसाइल हत्यारांनी जापोरिजिया भागात सैन्य आणि सामान्य व्यवस्थांवर हल्ला करत आहेत.

Russia using 'Z' Symbol in War: यूक्रेनवर रशियाने हल्ला केला तेव्हा Z हे चिन्ह चर्चेचा विषय ठरलं होतं. हे चिन्ह रशियन सैनिकांच्या सर्वच वाहनांवर बघायला मिळालं. हे असं अक्षर आहे जे 'Cyrillic Russian Alphabet' मध्ये नाही. यूक्रेनची न्यूज एजन्सी 'Ukrinform' ने दावा केला आहे की, आता रशियन सैन्य अभियानाचं प्रतीक असलेला 'Z' अचानक रशियन सैनिकांकडून मिटवण्यात येत आहे. याच न्यूज एजन्सीने दावा केला की, रशियन सैन्य त्यांच्या हार्डवेअरवरून Z हे अक्षर मिटवत आहे आणि जापोरिजीया भागात यूक्रेनियन झंडे लावत आहे.

न्यूज एजन्सीने दावा केला आहे की, रशियन द्वारे हे प्रतीन चिन्ह मिटवणं आणि दुश्मनांचा झेंडा लावणं हा प्रकार जापोरिजियाच्या नागरिकांनी ओळखू नये या भितीनीने केलेला प्रयत्न असू शकतो. सोबतच यूक्रेन सैनिक आणि स्वयंसेवी दलाकडून शोध मोहिम किंवा चौकशी रोखण्यासाठीही हा एक खेळ करण्याचा प्रयत्न असू शकतो. तेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने पूर्व यूक्रेन भागात आपलं अभियान वाढवलं आहे.

यूक्रेनियन मीडियानुसार, रशियन सैनिक मिसाइल हत्यारांनी जापोरिजिया भागात सैन्य आणि सामान्य व्यवस्थांवर हल्ला करत आहेत. रिपोर्ट्सनुसार जापोरिजिया भागात नागरी वस्त्यांमध्ये रशियन सैनिक त्यांच्या वाहनांवरून, उपकरणांवरून Z हे अक्षर मिटवताना आणि यूक्रेनी झेंडा लावताना दिसले आहेत.

यूक्रेनवर हल्ला सुरू झाल्यापासूनच रशियाच्या सैन्य वाहनांवर 'Z' असं चिन्ह बघायला मिळतं. ही वाहने कीव आणि इतर शहरांमध्ये फिरताना दिसली. रशियन सैन्याच्या वाहनांवरील 'Z' प्रतीकाचे दोन अर्थ असण्याचा अंदाज लावला जात आहे.

याचा एक संभावित अर्थ 'Za pobedu' आहे ज्याचा अर्थ 'Victory' होऊ शकतो. त्यासोबतच याचा दुसरा अर्थ 'Zapad' ज्याचा अर्थ 'पश्चिम' होऊ शकतो. Z ला रशियन सेनेसाठी आपले शेजारी, शक्ती ओखळणे, आग अशा घटना रोखण्यासाठीही एक तंत्र मानलं जातं. काही मीडिया साइट्सने दावा केला आहे की, Z यूक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी दिलेला सिम्बॉलपैकी एक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ फेब्रुवारीलाल डोनेट्स्क भागात प्रवेश करताच 'Z' हे चिन्ह पहिल्यांदा रशियन सैनिकांच्या वाहनांवर बघण्यात आलं होतं. तर काही रिपोर्ट्समध्ये असा दावा आहे की, रशियाने Peninsula वर ताबा मिळवल्यानंतर 'Z' चिन्ह २०१४ मध्ये क्रीमियामध्ये सैन्यांच्या वाहनांवर दिसलं होतं.

याबाबत यूक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेजनिकोव म्हणाले होते की, 'Z' चिन्ह नाझी चिन्हासारखं दिसतं. त्यांनी असाही तर्क दिला होता की, १९४३ मध्ये साक्सेनहौसेन एकाग्रता शिबिराजवळ एक 'जेड' स्टेशन होतं, जिथे लोकांची सामूहिक हत्या केली जात होती.