शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अटकेत असलेल्या मादुरोंवर भारतीय अध्यात्माचा प्रभाव! व्हेनेझुएलाच्या नेत्यांचे श्री सत्य साईबाबांसोबत आहे भक्तीचे नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:10 IST

1 / 9
या जागतिक घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेला वेनेझुएला आता भारताचे आध्यात्मिक केंद्र असलेले आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी आले आहे. कारण, पायउतार झालेले मादुरो आणि नव्या राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज हे दोघेही भारतीय आध्यात्मिक गुरु श्री सत्य साईबाबा यांचे निस्सीम भक्त आहेत.
2 / 9
निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांचा भारताशी असलेला ओढा जुना आहे. २००५ मध्ये परराष्ट्र मंत्री असताना मादुरो यांनी पुट्टपर्थी येथील 'प्रशांती निलयम' आश्रमाला भेट दिली होती. तिथे त्यांनी साईबाबांचे खाजगी दर्शन घेतले होते.
3 / 9
महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्राध्यक्ष असताना मादुरो यांच्या कार्यालयात सायमन बोलिव्हर आणि ह्यूगो चावेझ यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या फोटोंसोबत श्री सत्य साईबाबांचा फोटो कायम असायचा. नोव्हेंबर २०२५ मध्येच मादुरो यांनी साईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना 'प्रकाशपुंज' संबोधून आदरांजली वाहिली होती.
4 / 9
मादुरो यांना अटक झाल्यानंतर सूत्रे हाती घेतलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज यादेखील साईबाबांच्या भक्त आहेत. ऑगस्ट २०२३ आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी स्वतः पुट्टपर्थीला जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते.
5 / 9
ऑक्टोबर २०२४ मध्ये जेव्हा त्या भारताच्या अधिकृत दौऱ्यावर होत्या आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली होती, तेव्हाही त्यांनी वेळ काढून पुट्टपर्थी गाठले होते. त्यांच्या या भेटी वैयक्तिक स्वरूपाच्या होत्या आणि तिथे त्यांना मन:शांती मिळत असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.
6 / 9
अमेरिकन सैन्याने निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर व्हेनेझुएलात तणावपूर्ण शांतता आहे. डेल्सी रॉड्रिग्ज यांनी शपथ घेताना या कारवाईला बेकायदेशीर लष्करी आक्रमण म्हटले आहे. मादुरो यांचा मुलगा निकोलस मादुरो ग्वेरा यानेही नॅशनल असेंब्लीत उपस्थित राहून अमेरिकेच्या या कृतीचा निषेध केला.
7 / 9
व्हेनेझुएलामध्ये सत्य साईबाबांचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. मादुरो सरकारच्या काळात साईबाबांच्या संस्थांना विशेष संरक्षण मिळाले होते. तिथे अनेक साई सेंटर्स, शाळा आणि मानवी मूल्ये शिकवणारी केंद्रे कार्यरत आहेत.
8 / 9
सत्य साईबाबांनी दिलेली सत्य, धर्म आणि अहिंसेची शिकवण एकीकडे आणि दुसरीकडे मादुरो यांच्यावर असलेले हिंसाचार व दडपशाहीचे आरोप, हा विरोधाभास आता जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
9 / 9
व्हेनेझुएलाच्या संविधानानुसार, राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीत ३० दिवसांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. मात्र, अमेरिकेचा हस्तक्षेप आणि देशांतर्गत अस्थिरता पाहता, व्हेनेझुएलाचे भवितव्य काय असेल आणि डेल्सी रॉड्रिग्ज या आध्यात्मिक शांतता आणि राजकीय संघर्ष यात कशा प्रकारे समतोल साधतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
टॅग्स :saibabaसाईबाबाAmericaअमेरिकाIndiaभारत