शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

इराणमधील हल्ल्यानं का बिथरला पाकिस्तान?; इस्रायलला दिली कडक वॉर्निंग, "यापुढे लक्षात ठेवा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:32 IST

1 / 10
इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास मोठे हल्ले केले. हा हल्ला पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाच्या अगदी जवळ झाला. ज्यामुळे इथल्या परिसरात दहशत पसरली. या हल्ल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने इस्रायलला थेट धमकी दिली आहे. आम्ही कतार नाही, तुमचे हल्ले निमूटपणे सहन करायला असा इशारा पाकिस्तानने इस्रायलला दिला आहे.
2 / 10
प्राथमिक माहितीनुसार इस्रायली हल्ल्यात दूतावासाच्या परिसराला थेट लक्ष्य करण्यात आले नव्हते. परंतु हल्ल्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये दहशत पसरली. या हल्ल्यात सर्व पाकिस्तानी राजनयिक व त्यांचे कर्मचारी सुरक्षित आहेत. दूतावास कार्यालयातील काचेच्या खिडक्याही शाबूत आहेत, परंतु हल्ल्यांमुळे आजूबाजूच्या इमारतींना मोठा धक्का बसला आहे.
3 / 10
हल्ल्यानंतर पाकिस्तानी सरकारशी संलग्न असलेल्या 'पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरम'ने एक तीव्र प्रतिक्रिया जारी करून इस्रायलला धमकी दिली. या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलने हे लक्षात ठेवावे की, पाकिस्तान कतार नाही. जगात कुठेही आमच्या दूतावास अधिकाऱ्यांना इजा झाल्यास आम्ही असा हल्ला करू जो तुम्ही कायम लक्षात ठेवाल असा थेट इशारा त्यांनी दिला.
4 / 10
इस्रायलने ताज्या हवाई हल्ल्यांमध्ये राजनयिक निवासस्थानांजवळील भागांसह इराणच्या अनेक भागांना लक्ष्य करण्यात आले. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्धाला आता जवळपास १ महिना होत आला आहे. त्यात हे युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत.
5 / 10
इस्रायल आणि अमेरिका तेहरान, काशान आणि आबादानसह इराणच्या अनेक शहरांवर वारंवार हल्ले करत असून त्यामुळे संघर्ष आणखी चिघळत आहे. पाकिस्तानी दूतावासाजवळील हल्ल्यांमुळे या संकटात एक नवीन भू-राजकीय तणाव निर्माण झाला आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा पाकिस्तान इराण आणि अमेरिका यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे.
6 / 10
पाकिस्तानने या मध्य पूर्वेतील संघर्षात मध्यस्थीची भूमिका बजावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर अमेरिका आणि इराण दोघेही सहमत असतील तर पाकिस्तान चर्चेचे आयोजन करण्यास तयार आहे असं इस्लामाबादच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
7 / 10
रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये थेट चर्चेची तयारी सुरू असल्याचेही बोलले जाते. परंतु याला स्वतंत्रपणे दुजोरा मिळालेला नाही. त्याशिवाय अमेरिका आणि इराण यांच्यात यापूर्वी अप्रत्यक्ष चर्चा झाली आहे आणि पाकिस्तानमध्ये लवकरच एका बैठकीचे नियोजन केले जात आहे असं जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांनी सांगितले.
8 / 10
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीज पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांची अंतिम मुदत पुढे ढकलल्याची घोषणा केली. जी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याशी जोडलेली होती. जर ही सामुद्रधुनी बंद राहिली तर इराणला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
9 / 10
तर बनावट बातम्या देणाऱ्या माध्यमांच्या खोट्या वृत्तांकनानंतरही वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या खूप चांगल्या प्रकारे सुरू आहेत असं ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची अंतिम मुदत आता ६ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
10 / 10
दरम्यान, इस्रायलनं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघर गालिबफ यांच्यावर हल्ला न करण्याचा शब्द दिला आहे. पाकिस्तानने अमेरिकेकडे आग्रह धरला त्यानंतर इस्रायलने हे पाऊल उचलले. इस्रायलवर दबाव टाकून या दोन नेत्यांना टार्गेटवरून हटवले जावे अशी मागणी पाकिस्तानने अमेरिकेकडे केली होती. त्यानंतर पाकिस्तानी दूतावासाजवळ झाल्याने या हल्ल्यामुळे पाकिस्तान संतापला आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIsraelइस्रायलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर