pakistan economic crisis food item rate high parle g biscuit 50 rs
५ रुपयाचं पार्लेजी ५० रुपये, तर ब्रेड २०० रुपये; पाकिस्तानात महागाईचा हाहाकार! काय चाललंय पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 03:30 PM2023-01-10T15:30:14+5:302023-01-10T15:35:43+5:30Join usJoin usNext पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. महागाई इतकी वाढलीय की भारतात ५ रुपयांना मिळणारे पार्लेजी बिस्कीट पाकिस्तानात ५० रुपयांना विकले जात आहे. आपल्या देशात ४०-५० रुपयांना मिळणारे ब्रेडचे पाकिट पाकिस्तानमध्ये १५०-२०० रुपयांना विकले जात आहे. मूठभर पीठासाठी लढाई सुरू आहे. शिवाय पिठाच्या गोण्यांच्या सुरक्षेसाठी एके-४७ असलेले सैनिक तैनात आहेत. पीठ मिळावं म्हणून अक्षरश: लोक रडत आहेत आणि विनवणी करत आहेत. दहशतवादी देशात हाहाकार माजवत आहेत. देश आर्थिक पातळीवर कोलमडलेला असताना दहशतवाद्यांचे कारनामे काही केल्या थांबताना दिसत नाहीत. तर बिलावलसारखे त्यांचे नेते भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरत आहेत. पाकिस्तानातील दुकानदाराने सांगितले की, गरजेच्या वस्तूंच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. जे बिस्किट ५ रुपयांना विकायचे ते आता ५० रुपयांना विकले जात आहे. ४५० रुपये किलोने पीठ विकले जात आहे. रिफाइंड तेल ८५० रुपये प्रति लिटर झाले आहे. दरात ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. जनता रस्त्यावर आली आहे. सरकारने आम्हाला मारून टाकलं तर बरं होईल अशी लोकांची भावना झाली आहे. लोक वाहनांच्यासमोर आडवे होऊन निषेध व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर येथील काही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. दुकानाबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वाहनासमोर आडवा पडून पीठ द्या नाहीतर अंगावरुन गाडी न्या मारुन टाका असा निषेध व्यक्त करताना दिसतो आहे. आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये लोक पिठासाठी भांडताना दिसत आहेत. पाकिस्तानात पीठाच्या एका पोत्यासाठी वाद होत आहेत. हाणामारी होत आहे. आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये शेकडो महिला ट्रकच्या मागे धावत आहेत. या ट्रकमध्ये पिठाची पोती भरलेली दिसत आहेत. परकीय पैशावर पोट भरत असलेल्या पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाचं समर्थन केलं आहे. मिळणाऱ्या पैशाचा पाकिस्ताननं भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापर केला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा मदत केली आहे. इतर देशांच्या तुकड्यांवर जगत असलेला हा देश आपल्याच कृत्याची शिक्षा भोगत आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशात कंपन्या येत नाहीत. परदेशी गुंतवणूक नाही. वर्षभरापूर्वी आलेल्या पुराने देश पुरता मोडून काढला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोक आक्रोश करत आहेत. अनेक दिवस लोकांना पीठ मिळालेलं नाही. पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत. एका व्हिडिओमध्ये एक पोलिस हातात एके-४७ घेऊन चक्क पिठाच्या गोण्यांचे रक्षण करत आहे. नुकतीच शरीफ मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आधी ऊर्जा संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पाकिस्तानात वीज वापरावर देखील बंधनं घालण्यात आली आहेत. टॅग्स :पाकिस्तानPakistan