इराकमध्ये आता मांजरांसाठी पंचतारांकित हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 20:09 IST2018-04-04T20:09:41+5:302018-04-04T20:09:41+5:30

इराकमधल्या बसरा शहरात देशातीत सर्वात पहिलं मांजरांसाठीचं हॉटेल उघडलं आहे. 22 वर्षांच्या अहमद ताहेर मकी या पशुवैद्यकीय विद्यार्थ्यानं हे हॉटेल मांजरांसाठी बनवलं आहे.

या हॉटेलच्या माध्यमातून बसरा शहरात मांजरांना दत्तक घेणा-यांसाठी प्रोत्साहित करण्याचा त्याचा मानस आहे.

तसेच या हॉटेलमध्ये आजारी असलेल्या मांजरांसाठीही एक वेगळ्या खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या सर्व लक्झरी सुविधा फारच कमी मूल्यात उपलब्ध आहेत. दोन खोलांच्या या हॉटेलमध्ये बेड, वेगवेगळ्या प्रकारचं निरोगी अन्न, छोटंसं खेळाचं मैदान आणि वातानुकूलित यंत्रणेची सुविधा आहे.

एका वेळी या हॉटेलमध्ये 30 मांजरी राहू शकतात. या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्याची किंमत 5 हजारांपासून 7 हजारांपर्यंत इराकी चलन आहे