कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भावाचे अमेरिकेतील आलिशान घर विक्रीला, किंमत तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:49 PM2021-08-02T14:49:46+5:302021-08-02T14:55:08+5:30

Osama and Ibrahim Bin Laden: अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात इब्राहिम बिन लादेनचे आलिशान घर आहे.

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणारा दहशतवादी ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) चा काही वर्षांपूर्वी अमेरिकेने खात्मा केला. आता ओसामाचा भाऊ इब्राहिम बिन लादेन (Ibrahim Bin Laden) चं एक आलिशान घर विक्रीला काढण्यात आलं आहे.

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये असलेलं हे आलिशान घर मागील 20 वर्षंपासून रिकामी आहे

या घराच्या विक्रीची माहिती समोर येताय, प्रचंड व्हायरल झाली. अमेरिकन सरकारने या हवेलीची किंमत तब्बल 2 अब्ज डॉलर ठेवली आहे.

अमेरिकेतील महाग शहरांपैकी एक असलेल्या लॉस एंजेलिसमध्ये इब्राहिम बिन लादेनने 1983 मध्ये हे घर खरेदी केलं होतं.

तेव्हा इब्राहिमने या घरासाठी 20 लाख डॉलर म्हणजेच 1.48 कोटी रुपये मोजले होते.

हे घर दोन एकरात पसरलेली असून, लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध हॉटेल बेल एअर आणि बेल एअर कंट्री क्‍लबपासून काही अंतरावर आहे

2001 मध्ये ओसामा बिन लादेनने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या हल्यानंतर त्याच्या भावाने या घरात राहणं बंद केलं होतं.

एका अंदाजानुसार इब्राहिम बिन लादेन त्याची माजी पत्‍नी क्रिस्‍टीनसोबत या घरात राहत होता. पण, 9/11 नंतर तो निघून गेला.

हे घर 1931 मध्ये बनवण्यात आलं होतं. यात सात बेडरूम आणि पाच बाथरुमसह गार्डन आणि इतर मोठा परिसरत आहे.