शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गंभीर आजाराने पीडित मुलांना देता येणार मृत्यू, या देशाने दिली परवानगी

By बाळकृष्ण परब | Published: October 19, 2020 2:59 PM

1 / 6
इच्छामरण देणे चांगले की वाईट यावरून जगातील अनेक देशांत चर्चा होत असते. मात्र नेदरलँडमधील सरकारने गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या मुलांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
2 / 6
नेदरलँडमध्ये गंभीर आजारांशी झुंजत असलेली काही मुले अशी आहेत. तसेच या मुलांच्या कुटुंबीयांना त्यांचे होत असलेले हाल पाहणे कठीण होत आहे. अशी कुटुंबे आजारी मुलांना इच्छामृत्यू देण्याची परवानगी सरकारकडे मागत होती. दरम्यान, नेदरलँड सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गंभीर आजारांनी पीडित असलेल्या मुलांचा त्रास संपवण्यासाठी त्यांना मृत्यू देण्याची परवागनी डॉक्टरांना देण्यात आली आहे.
3 / 6
मात्र डच सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर वैद्यकीय क्षेत्रात मुलांना अशा प्रकारे मृत्यू देण्याचा पद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान जर कुणाला गंभीर आजार झाला असेल, ज्याच्यावर काही उपचार नसेल, तसेच हा आजार त्रासदायक असेल तर अशा परिस्थितीत अशा व्यक्तीला डॉक्टरांच्या मदतीने मृत्यू देता येईल, असा डच सरकारचा आधीपासूनच कल होता.
4 / 6
डॉक्टरांच्या मदतीने कुटुंबीयांच्या परवानगीने १२ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना अशाप्रकारे मृत्यू दिला जाईल. दरम्यान, या निर्णयामुळे कुटुंबीयांचा त्रास कमी करता येईल, असा दावा करण्यात येत आहे.
5 / 6
या निर्णयाबाबत डच सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या डी. जाँग यांनी संसदेला एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी देशात गंभीर आणि उपचार नसलेल्या आजाराने ग्रस्त असलेल्या एका १२ वर्षांच्या मुलाला त्याच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार मृत्यू देण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या आजारामुळे पीडित मुलाच्या आईवडिलांना भावनात्मक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागत आहे, असे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. मात्र यासाठी पीडित मुलाच्या आई-वडिलांची परवानगी आवश्यक असेल.
6 / 6
सध्या जगात ट्री बार्क डिसऑर्डर, कशिंग सिंड्रोम, न्यूरोफायब्रोमेटोसिससारखे काही आजार आहेत. ज्यांच्यावर अद्याप उपचार सापडलेले नाहीत. तसेच काही आजारांवर उपचार असले तरी ते एवढए महाग आहेत की त्याचा खर्च करणे शक्य नाही.
टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय