झिम्बाव्बेतील मोझाम्बिक शहर इडाई चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 13:14 IST2019-03-20T13:08:41+5:302019-03-20T13:14:45+5:30

आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत चार देशांना वादळानंतर पूराचा तडाखा बसला आहे, १५३ जणांचा मृत्यू; एक कोटीपेक्षा जास्त लोकांना फटका बसला असून मोझाम्बिकमध्ये 1 हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
जोरदार हवा आणि अचानक वाढलेल्या पाण्यामुळे जनमान विस्कळीत झाले असून पूराच्या पाण्यामध्ये अनेक जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जातेय. मोझांबिकच्या राष्ट्रपतीने यावर दुख: व्यक्त केले आहे.
अमेरिकेतील नेब्रास्कात 52 वर्षांनंतर असा पूर आला असून 4 नद्यांची पातळी वाढल्याने 2600 लोकांना एअरलिफ्ट केले आहे तर 200 जण अद्यापही बेपत्ता आहेत.
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस एंड या सोसायटीने सांगितल्यानुसार बेहरा या शहराचं पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून 5 लाख 30 हजार लोकसंख्या असलेल्या या शहराचा 90 टक्के भाग पूराच्या पाण्यात नष्ट झाला आहे.
नेब्रास्कात धरण फुटल्याने दोन विभागात पूर आला आहे. लोकांनी छतावर जाऊन प्राण वाचवले. सोमवारपर्यंत २६०० लोकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट केले. तिकडे नेब्रास्का हवाई दल तळ पुराच्या पाण्याने वेढला आहे
पुराच्या पाण्यामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं काम प्रशासनाकडून सुरु आहे.