शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसॉफ्टची नोकरी गेली, रशियात रस्ता साफसफाई करतोय भारतीय इंजिनिअर; सॅलरी ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:35 IST

1 / 10
भारतात सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या नोकऱ्या अजूनही सुरक्षित आणि प्रतिष्ठेचे करिअर मानलं जाते, बऱ्याच आयटी कंपन्यांना इंजिनिअरची गरज असते. परंतु नोकऱ्यांमध्ये कर्मचारी कपात त्यामुळे युवकांना कामावरून काढले जाते. यात अनेक मोठ्या कंपन्यांची नावे आहेत, ज्यांनी कर्मचारी कपात केली आहे.
2 / 10
वाढत्या बेरोजगारी आणि नोकरीवरून काढल्याने सुशिक्षित युवक पडेल ती कामे करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियामध्ये एक भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आता रोड सफाई कामगार म्हणून काम करत आहे, ज्याला मासिक पगार सुमारे १ लाख रुपये आहे.
3 / 10
लाइव्हमिंटच्या रिपोर्टनुसार, २६ वर्षीय मुकेश मंडल हा रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे रस्त्यावरील सफाई कामगार म्हणून काम करतो. मुकेश पूर्वी सॉफ्टवेअर डेव्हलपर होता आणि त्याने मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये काम केले आहे.
4 / 10
हा पण त्याने थेट मायक्रोसॉफ्टसाठी काम केलंय की त्याच्या थर्ड पार्टीसोबत काम केलंय हे स्पष्ट नाही. अनेकदा मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्या विविध कंपन्यांकडून प्रोजेक्ट प्रकल्प म्हणून काम करून घेतात.
5 / 10
मुकेश एकटाच नाही तर रशियामध्ये सुमारे १७ भारतीय नागरिक रस्त्यावरील सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. त्यापैकी काहींनी प्री वेडिंग प्लॅनिंग, ड्रायव्हिंग, आर्किटेक्चर आणि इतर व्यवसायांमध्ये काम केले होते. ते सर्व सुमारे चार महिन्यांपूर्वी रशियात आले होते.
6 / 10
रशिया सध्या तीव्र कामगार टंचाईचा सामना करत आहे. परिणामी तेथील कंपन्या परदेशातून कामगारांची भरती करत आहेत. सेंट पीटर्सबर्गमधील एका कंपनीने या भारतीयांना कामावर ठेवले आहे आणि त्यांना निवास, भोजन आणि सुरक्षा पुरवत आहे.
7 / 10
पगाराच्या बाबतीत हे व्यक्ती दरमहा सुमारे १ लाख ते १ लाख १० हजार इतकी कमाई करत आहेत. भारतीय मानकांनुसार ही रक्कम बरीच चांगली मानली जाते विशेषतः अशा वेळी जेव्हा अनेक देशांमध्ये नोकऱ्यांचा दबाव असतो.
8 / 10
मुकेश म्हणतो की, मी ही नोकरी तात्पुरत्या आधारावर स्वीकारली. माझे ध्येय काही काळ काम करणे, पैसे वाचवणे आणि नंतर भारतात परतणे हे आहे. कोणतीही नोकरी लहान किंवा मोठी नसते असं मला वाटते. मुख्य ध्येय कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा आहे असं त्याने सांगितले.
9 / 10
ही बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकजण याला प्रेरणादायी म्हणत आहे तर काहीजण सुशिक्षित तरुणांना असे निर्णय घेण्यास भाग पाडले जाते का असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
10 / 10
मात्र मुकेशच्या निमित्ताने हे प्रखरतेने दिसून येते की, बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे नोकऱ्या आणि करिअरची व्याख्या बदलत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात अनिश्चितता असताना काही देशांमध्ये मानवी कामगारांनाही चांगल्या संधी निर्माण होत आहेत.
टॅग्स :russiaरशियाjobनोकरीIndiaभारत