शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बराक ओबामांच्या 'त्या' जर्सीचा लिलाव, इतकी लागली बोली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 8:40 PM

1 / 8
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी १९७९ मध्ये हवाईतील पुनाहौ स्कूलमध्ये झालेल्या बास्केटबॉलच्या सामन्यावेळी परिधान केलेल्या जर्सीचा लिलाव करण्यात आला आहे.
2 / 8
ही जर्सी १९२,००० डॉलर म्हणजेच १ कोटी ४० लाख रुपयांना विकली आहे. आतापर्यंतची हायस्कूलमधील जर्सीसाठीची ही सर्वात मोठी बोली आहे. या खास पांढर्‍या जर्सीचा नंबर 23 आहे.
3 / 8
एनबीएचे सेवानिवृत्त मायकेल जॉर्डन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि एनएफएलचे माजी क्वार्टरबॅक कॉलिन केपर्निक यांनी परिधान केलेल्या जर्सीने शुक्रवारी लिलावात जागतिक विक्रम नोंदविला.
4 / 8
शुक्रवारी संपलेल्या चार दिवसांच्या लिलावात एनबीए लॉस एंजेलिस लेकर्स स्टार लेब्रोन जेम्सच्या जर्सीचाही समावेश होता. दरम्यान, बास्केटबॉल सामने आणि मालिकांचे आयोजन करणारी एनबीए ही अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था आहे.
5 / 8
पाच वेळा एनबीए मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर आणि 14 वेळा एनबीए ऑल-स्टार प्लेमेकरद्वारे परिधान केलेल्या कोणत्याही जर्सीसाठी ही विक्रमी बोली आहे. जॉर्डन यांनी आपल्या पहिल्या सामन्यात बुल्स क्लबचा सदस्य म्हणून ही पांढरी जर्सी परिधान केली होती.
6 / 8
जॉर्डन यांच्या जर्सीसाठी यापूर्वी विक्रमी बोली लावण्यात आली आहे. १८ जुलै रोजी इंडियाना विरुद्ध १९९८ च्या सामन्यात परिधान केलेली जर्सीचा लिलाव २८८,००० डॉलर्समध्ये झाला होता.
7 / 8
ओबामा यांच्या २३ नंबरच्या पांढर्‍या रंगाच्या जर्सीचा लिलाव १९२,००० डॉलरमध्ये करण्यात आला. ओबामा यांनी १९७९ मध्ये एका सामन्यात खेळाडू म्हणून ही जर्सी परिधान केली होती. दरम्यान, या कोणत्याही हायस्कूलच्या जर्सीसाठी ही विक्रमी किंमत आहे.
8 / 8
इतर वस्तू आणि कोबे ब्रायंट यांनी स्वाक्षरी केलेल्या एनबीए फायनल जर्सीचा लिलाव ३८,४०० डॉलरमध्ये झाला. १९५८ फिफा विश्व कपमध्ये एका अधिकृत टीमच्या कॅप्टनचे आर्मबँड १०,२४० डॉलरमध्ये विकण्यात आले.
टॅग्स :Americaअमेरिका