नॉर्वेत कोसळले उल्का पिंड, आकाशात मोठ्या आवाजासह दिसला प्रकाश, जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:04 AM2021-07-26T11:04:38+5:302021-07-26T11:09:11+5:30

Meteor Lights Up Norway: या उल्का पिंडाचा काही भाग राजधानी ओस्लोजवळ पडल्याची माहिती आहे.

नॉर्वेच्या आकाशात रविवारी एक मोठा उल्का पिंड दिसला. लोकांना हा उल्का पिंड कोसळताना मोठा आवाजही ऐकू आला.

जाणकारांचे म्हणणे आहे की, या उल्काचा काही भाग राजधानी ओस्लोमध्ये पडला असावा. पण, अद्याप कोणत्याही नुकसानीची माहीती समोर आलेली नाही.

उल्का पिंड दिसल्याच्या बातम्या मध्यरात्री 1 वाजेपासून सुरू झाल्या. ट्रोनधेम शहरातील होलमेस्ट्रँड परिसरात लागलेल्या एका वेब कॅमऱ्यात हा उल्का पिंड पडतानाचे दृष्य कैद झाले.

नॉर्वेमधील उल्का पिंडांवर अभ्यास करणारे जाणकार या व्हिडिओ फुटेजचे अॅनालिसिस करुन उल्का पिंडाचे ओरिजन आणि ही उल्का कुठे कोसळली, याचा शोध घेत आहेत.

प्राथमिक तपासात ही उल्का नॉर्वेची राजधानी ओस्लोपासून 60 किमी दूर फिनेमार्काच्या जंगलात कोसळल्याची माहिती मिळत आहे.

उल्का पिंडावर अभ्यास करणारे मोर्टेन बिलेट यांनी हा उल्का पिंड आकाशातून पृथ्वीर पडताना पाहिलाय.

त्यांनी सांगितल्यानुसार, ही उल्का प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने आली. रविवारी दुपारपर्यंत या उल्काचे अवशेष सापडले नाहीत.

बिलेटने पुढे सांगितले की, उल्का पिंड 15-20 किमी प्रती सेकेंदाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होती आणि जवळपास 6 सेकंद याचा लख्ख प्रकास दिसला.

काही नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांना या उल्काच्या प्रकाशासह एक जोराचा झटका लागला