मेरी ख्रिसमस
By admin | Updated: December 26, 2014 00:00 IST2014-12-26T00:00:00+5:302014-12-26T00:00:00+5:30
नाताळच्या निमित्ताने लहानग्यांना मिळालेल्या गिफ्टनी त्यांच्यात कमालीचे आनंदाचे वातावरण होते. तसेच सुटी असल्याने काही पालकांनी मुलांना घेऊन बाहेरगावी जाण्याचा बेत केला. याचबरोबर नवनवीन कपडे खाऊ यांची चंगळ होतीच.
काल रात्रीपासूनच व्हॉट्सअँप आणि इतर सोशल साइट्सवर
ख्रिसमसनिमित्त एकमेकांच्या घरी जाऊन केक चॉकलेट आणि विविध भेटवस्तू देऊन आनंद साजरा केला. त्याचबरोबर ठिकठिकाणी संगीताच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. नाताळनिमित्त शहरातील तारांकित हॉटेलांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सिलिगुडीमध्ये सेंट मेरी चर्चबाहेर साजरा करण्यात आलेला ख्रिसमस.
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना इस्लामी कट्टरतावादी त्रास देत असल्याच्या पार्श्वभूमीवरही लाहोरमधल्या कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिश्चनांनी ख्रिसमस साजरा केला आणि शांततेसाठी प्रार्थना केली.
गुलाबी थंडीच्या वातावरणात मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असलेला नाताळ सण आला. झमगत्या मॉल्समध्ये ख्र्रिसमस ट्रीसह सांताक्लॉज अवतरले.
ख्रिसमसनिमित्त गुरूवारी व्हॅटिकनमध्ये सेंट पिटर बॅसिलिकाच्या सज्जातून पोप फ्रान्सिस यांनी पांरपारिक
ख्रिश्चनांचा सर्वात मोठा नाताळ सण अर्थात प्रभू येशूंचा जन्मोत्सव गुरुवारी जगभरात मोठ्या उत्साहाने व जल्लोषात साजरा करण्यात आला.
बायबलच्या काळातली बेथेलहॅममधल्या वेस्ट बँक शहरात येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्याचे मानण्यात येते. त्या ठिकाणचे ख्रिसमसच्या रात्रीचे हे दृष्य.
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पोप फ्रान्सिसनी व्हॅटिकन सिटीमध्ये बेबी येशूच्या पुतळ्याचे अनावरणकेले व चुंबन घेत आदर व्यक्त केला.