By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:46 IST
1 / 8पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या मेकअपसाठी सरकारने तब्बल ४ कोटी रुपयांचा विशेष निधी जारी केला आहे. एकीकडे सामान्य जनता पिठाच्या पाकिटासाठी रांगेत उभी असताना, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सौंदर्यावर होणाऱ्या या उधळपट्टीमुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. 2 / 8पंजाब सरकारच्या कॅबिनेट सेक्रेटीने १२ जानेवारी रोजी एक अत्यंत गोपनीय आदेश जारी केला होता. या आदेशानुसार, मुख्यमंत्री मरियम नवाज आणि माहिती मंत्री आझम जाहीद बुखारी यांच्या मेकअप तसेच बैठका आणि जाहीर सभांमध्ये स्वतःला व्यवस्थित सादर करण्यासाठी ४ कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 3 / 8पाकिस्तानी राजकारणात, मरियम नवाज शरीफ केवळ त्यांच्या दमदार आवाजासाठीच नव्हे तर त्यांच्या ड्रेसिंग सेन्ससाठी देखील ओळखल्या जातात.4 / 8मरियम नवाज यांचा लूक त्यांच्या सुंदरतेमुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असतो. वयाच्या पन्नाशीच्या जवळ असूनही, त्या ज्या पद्धतीने राहतात त्यामुळे सर्वत्र कौतुक होत असतं. आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी फॅशन डिझायनर्स मरियम यांची स्टाईल क्लासिक मानतात. 5 / 8मरियम नवाज यांची ही पहिलीच उधळपट्टी नाही. यापूर्वी त्यांच्या सरकारी गाडीचे टायर बदलण्यासाठी १ कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केल्याचे प्रकरण गाजले होते. सध्या पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला आहे. अशा भीषण परिस्थितीत सरकारी पैशाने स्वतःचे सौंदर्य खुलवणे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे.6 / 8हा आदेश अत्यंत गोपनीय पद्धतीने जारी करण्यात आला होता, पण सरकारमधील काहींनी अंतर्गत विरोध करण्यास सुरुवात केली. परिस्थिती आता अशा टप्प्यावर पोहोचली की पाकिस्तानच्या पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत.7 / 8पाकिस्तानच्या या 'शाही' खर्चाचा विरोधाभास न्यूयॉर्कमधील त्यांच्याच दूतावासाच्या पत्रावरून स्पष्ट होतो. न्यूयॉर्कमधील पाकिस्तानी कॉन्सुलेटने सरकारला पत्र लिहून कळवले की, जुलै २०२३ ते जून २०२४ या काळातील ३.५ कोटी रुपयांचे बिल थकले आहे. यामध्ये लिफ्ट, हीटर दुरुस्ती आणि गाड्यांचे पेमेंट रखडले आहे.8 / 8स्वतःच्या दूतावासांचे बिल भरायला पैसे नसताना नेत्यांच्या मेकअपवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची पाकिस्तानची वृत्ती पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.