शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 12:37 IST

1 / 9
कोणाचे नशीब कसे फळफळेल याचा नेम नाही. नेहमी आपण दुबई, अबुधाबीच्या लॉटरींची चर्चा करत असतो. बहुतांशी भारतीयांना ही तिकिटे मालामाल करतात. परंतू, यावेळी अमेरिकेच्या एका महिलेच नशीब फळफळले आहे.
2 / 9
अर्थात ही दुबईची किंवा अबुधाबीची लॉटरी नाहीय पण तिने ज्या पद्धतीने अमेरिकेतील ही लॉटरी जिंकली आहे, ते पाहून तुमचे डोके चक्रावणार आहे.
3 / 9
अमेरिकेच्या शेफर्ड्सविलेमध्ये पामेला हॉवर्ड थॉर्टन नावाची महिला राहते. तिने 'फ्लेमिंगो बिंगो'या लॉटरीची चार तिकिटे खरेदी केली होती. निकाल लागला तेव्हा तिने आपल्याकडील तीन तिकिटांवरील नंबर जुळवून पाहिले. तर ते लागलेले नव्हते.
4 / 9
यामुळे पामेलाने चौथे तिकीटही त्या तीन तिकिटांसोबत चुरगळून कचऱ्यात फेकून दिले. तिला वाटले चौथे तिकीटही लागलेले नसणार, या निराशेने तिने तसे केले होते.
5 / 9
तिने तिकीटाचा नंबर पाहिला नव्हता, तो न पाहताच तिने फेकले होते. नंतर रात्री तिच्या लक्षात आले की त्या तिकीटावरील नंबर पहायला हवा होता. तोवर तिचा कचरा ढिगाऱ्यात गेला होता. तिने तिकडे धाव घेत ते चौथे तिकीट शोधले.
6 / 9
या चौथ्या तिकीटावर तिला केवळ २०० डॉलर लागले होते. म्हणजेच १६५०० रुपये. तिने ते तिकीट दाखवून ते पैसे घेतले आणि पुन्हा 'फ्लेमिंगो बिंगो'ची चार तिकिटे खरेदी केली.
7 / 9
इथेच तिचे नशीब पालटले. तिने दुसऱ्यांदा खरेदी केलेल्या तिकीटावर तिला बंपर लॉटरी लागली. पामेलाने ६६ लाख रुपये जिंकले.
8 / 9
पामेलाचे नशीब फळफळले. आता तिला या रकमेपैकी कर वजा करून 57,000 डॉलर म्हणजेच ४७ लाख रुपये मिळणार आहेत.
9 / 9
पामेलाने सांगितले की, या पैशातून ती नवीन कार खरेदी करणार आहे. काही बिल आहेत ती फेडणार आहेत, तर काही पैसे ती तिच्या आईला देणार आहे.
टॅग्स :Americaअमेरिका