पिकनिकदरम्यान राहण्यासाठी हटके जागा शोधताय? मग ही ठिकाणं ठरू शकतात उत्तम पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 17:19 IST2019-06-20T15:49:29+5:302019-06-20T17:19:23+5:30

कुठेतरी दूर फिरायला जायचा प्लान केल्यावर फिरण्यासाठी ठिकाण निश्चित करण्याएवढेच तिथे राहण्यासाठी जागा निवडणेही महत्त्वाचे असते. जर पिकनिकदरम्यान राहण्यासाठी तुम्ही एखाद्या हटके ठिकाणाचा शोध घेत असाल तर खाली दिलेली ठिकाणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
नॉर्दन कॅलिफोर्निया
नॉर्दन कॅलिफोर्निया येथील केबिन राहण्यासाठी उत्तम पर्यात आहेत. येथील वास्तव्यात तुम्ही निसर्गाचा संपूर्ण आनंद घेऊ शकता. तसेच येथे येणाऱ्या प्रवाशांना सर्व सोईसुविधा मिळतील याची काळजीही घेण्यात आलेली आहे.
मन्सहुसेन आयलँड नॉर्वे
नॉर्वेमधील मन्सहुसेन आयलँड येथूनही निसर्गाचा अदभूत नजारा पाहायला मिळतो. येथे राहण्यासाठी बुकिंगच्या वेळीच काही रक्कम जमा करावी लागते. उर्वरित रक्कम मन्सहुसेन आयलँड्स येथे पोहोचल्यावर द्यावी लागते.
केरोनकसन, न्यूयॉर्क
न्यूयॉर्कमधील केरोनकन केबिनमधून पर्वतरांगेचे आणि तेथील वनस्पतींचे जवळून दर्शन घेता येते.
इटली
इटलीमध्ये तुम्हाला वास्तव्यासाठी कमी खर्चामध्ये केबिन उपलब्ध होऊ शकतात.
कॅटस्कील्स, अमेरिका
अमेरिकेतील नॉर्दन कॅटस्कील्स येथील केबिनसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथून तुम्ही हायकिंगपासून कॅम्पिंगपर्यंत सर्व नजारा पाहू शकता.
जेफरसन, अमेरिका
अमेरिकेतील जेफरसन येथील केबिनसुद्धा उत्तम आहेत. हे केबिन्स त्यांच्या खास लूकसाठी प्रसिद्ध आहेत.