शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:48 IST

1 / 10
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील बांगलादेश भारताविरोधात सातत्याने कुरापती करण्यापासून मागे हटत नाही. बांगलादेश आता भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉरजवळ लालमोनिरहाट हवाई क्षेत्राचा वापर सैन्याच्या कारवायांसाठी करण्याची योजना बनवत आहे. परंतु असं करून बांगलादेश स्वत:ने दिलेला शब्द मोडत आहे. बांगलादेश सैन्याचे तत्कालीन ब्रिगेडिअर जनरल नाजिम उद दौला यांनी २६ मे २०२५ रोजी एका पत्रकार परिषदेत या विमानतळाचा वापर सैन्यासाठी न करण्याचा शब्द दिला होता.
2 / 10
ब्रिगेडिअर नाजिम उद दौला यांना मागील १ सप्टेंबरला मेजर जनरल पदावर बढती दिली होती, तेव्हापासून ते ३३ व्या इन्फ्रॅन्टी डिविजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग आणि कोमिलाचे एरिया कमांडर म्हणून कार्यरत आहेत. ८ ऑगस्टला भारतीय संसदेत विचारलेल्या एका प्रश्नावर परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह यांनी स्पष्ट शब्दात भारत सरकारने बांगलादेशच्या लालमोनिरहाट एअरबेसशी निगडीत रिपोर्टवर लक्ष दिल्याचं म्हटले होते.
3 / 10
सिंह म्हणाले होते की, बांगलादेश सैन्याचे संचालक यांनी २६ मे २०२५ रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ज्यात त्यांनी लालमोनिरहाट एअरफिल्डच्या सैन्य वापराबाबत कुठलीही योजना नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु अलीकडच्या रिपोर्टमधून बांगलादेशाचं सैन्य त्यांनी दिलेला शब्द मोडत असल्याचे दिसते. या एअरबेसचा वापर सैन्यासाठी करण्याची तयारी सुरू आहे. जे भारताच्या बॉर्डरपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहे.
4 / 10
अलीकडेच १९ ऑक्टोबरला नॉर्थ ईस्ट न्यूजने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये लालमोनिरहाट एअरबेसवर एक मोठ्या हँगरच्या बांधकामाची माहिती दिली होती. बांगलादेश सैन्य या एअरबेसवर डिफेन्स प्रणालीचा भाग म्हणून एक नवीन रडार सिस्टम बसवण्याचं प्लॅनिंग करत आहे. भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळील लालमोनिरहाट एअरबेस मिसाइल लॉन्च साइट म्हणून काम करू शकतो असं या रिपोर्टमधून समोर आले आहे
5 / 10
बांगलादेशने तुर्की आणि चीनकडून खरेदी केलेल्या लष्करी दर्जाच्या ड्रोनसाठी या एअरबेसचा वापर करण्याची मोठी योजना आखली आहे. लालमोनिरहाट एअरबेस अपग्रेड करण्याच्या बांगलादेशच्या एकतर्फी निर्णयाला भारताने अधिकृतपणे विरोध केला आहे की नाही याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
6 / 10
१६ ऑक्टोबर रोजी भारतीय लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय टीम बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांच्यासोबत लालमोनिरहाट आणि जवळच्या ठाकूरगाव एअरफील्डला गेली होती. भारतीय अधिकाऱ्यांच्या भेटीवेळीही लालमोनिरहाट येथील हँगरचे काम सुरूच होते.
7 / 10
नॉर्थ ईस्ट न्यूजने हँगरच्या बांधकामाचे फोटो प्रकाशित केले, ज्यात छप्पर आणि खाडीच्या भिंती बसवण्यात आल्या आहेत असं म्हटलं होते. त्यासोबतच सात नवीन रडार सिस्टीमसाठी उपकरणे, ज्यामध्ये वाइड-बॉडी अँटेना समाविष्ट आहे तेदेखील एअरबेसवर नेण्यात आली आहेत असं म्हटलं होते.
8 / 10
दरम्यान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेली जवळीक यामुळे भारतासाठी आपल्या ईशान्य भागातील सुरक्षेवर अधिक लक्ष ठेवणं आवश्यक बनलं आहे. त्यातही देशाच्या इतर भागाला ईशान्य भारताशी जोडणाऱ्या आणि चिकन नेक अशी ओळख असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने या भागात तीन नव्या चौक्या उभ्या केल्या आहेत.
9 / 10
दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात हाफिजचे संपूर्ण कुटुंब मारले गेले होते. याचा बदला घेण्यासाठी हाफिजने पाकिस्तान नाही तर बांगलादेशचा वापर करण्याचे ठरविले आहे. आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी बांगलादेशमध्ये वारंवार ये-जा करत आहेत. त्यांच्या मदतीने हाफिज हा बांगलादेशचा वापर दहशतवाद्यांचे लाँच पॅड म्हणून करण्याची योजना आखत आहे.
10 / 10
सईदने बांगलादेशमध्ये आपल्या एका विश्वासू साथीदाराला पाठवले असून, तो तेथील तरुणांना 'जिहाद'ची चिथावणी देऊन त्यांना कट्टरपंथी बनवत आहे आणि दहशतवादी प्रशिक्षण देत आहे, अशी गोपनीय माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत