'या' 10 देशांमध्ये सर्वाधिक सोन्याचा 'खजिना', जाणून घ्या भारताचा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 15:47 IST2020-02-22T15:42:13+5:302020-02-22T15:47:22+5:30

उत्तर प्रदेशमधल्या सोनभद्रमध्ये सोन्याची खाण मिळाल्यानंतर सोने उत्पादनात भारत मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. सोन्याच्या खजिन्याच्या बाबतीत भारत मागे आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेजवळ भारतापेक्षा 13 पटीनं जास्त सोनं आहे. अमेरिकेजवळ एकूण 8,133.5 टन सोनं आहे.
सोन्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी जर्मनी आहे. जर्मनीकडे 3,366.8 टन सोनं आहे.
अमेरिका आणि जर्मनीनंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे एकूण 2,451.8 टन सोनं आहे.
चौथ्या स्थानावर इटली असून, इटलीकडे जवळपास 2,451.8 टन सोनं आहे.
पाचव्या स्थानी फ्रान्स असून, 2,436.1 टन सोनं उपस्थित आहे.
सहाव्या स्थानी रशिया असून, रशियाकडे 2,219.2 टन सोनं आहे.
भारताचा शेजारी असलेल्या चीनकडे 1,936.5 टन सोनं आहे.
स्वित्झर्लंड आठव्या स्थानी असून, त्यांच्याकडे 1,040 टन सोनं आहे.
जपान नवव्या स्थानी असून, जपानकडे 765.2 टन सोनं आहे.
तर भारत दहाव्या स्थानी असून, 618.2 टनांवर पोहोचला आहे.