शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कलियुगी बाप, पोटच्या पोराला विकले आणि त्या पैशातून गर्लफ्रेंडला फिरायला नेले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 7:16 PM

1 / 5
एका कलियुगी पित्याने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विकून त्या पैशामधून गर्लफ्रेंडसोबत देशभ्रमणास सुरुवात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीचा घटस्फोट झाला होता. तसेच तो एकट्याने आपल्या मुलाची देखभाल करत होता. मात्र मुलाची देखभाल करणे कठीण झाल्यावर या पित्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.
2 / 5
ही घटना चीनमधील असून, जेजियांग लिगल डेली ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, या पित्याचे आडनाव शी आहे. त्याचे त्याच्या पत्नीसोबत सातत्याने वाद होत असत. त्यामुळे त्या दोघांनीही घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन अपत्ये होती. त्यापैकी महिलेने मुलीला आपल्या ताब्यात घेतले, तर मुलग्याचा ताबा पित्याने घेतला होता.
3 / 5
मात्र हा पिता अन्य शहरात काम करत असल्याने त्याने आपल्या मुलग्याला भावाच्या कुटुंबाकडे हुजोऊ सिटीमध्ये सोडले होते. मात्र गेल्या महिन्यात तो या शहरात आला. त्यानंतर तो त्याच्या मुलाला घेऊन गेला होता. मुलाच्या आईची त्याला पाहण्याची इच्छा असल्याने त्याला घेऊन जात असल्याचे मुलाला घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.
4 / 5
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, शी याने त्याच्या मुलाला एका निसंतान दाम्पत्याला विकले. त्याने पोटच्या पोराचा साडे २४ हजार डॉलर म्हणजेच १७ लाख रुपयांना सौदा केला. त्यानंतर शी गर्लफ्रेंडसोबत देश भ्रमणासाठी निघून गेला.
5 / 5
मात्र जेव्हा अनेक दिवसांपर्यंत मुलगा परत न आल्याने तसेच शी याने फोन उचलणे बंद केल्याने शीच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शी याला अटक केली. दरम्यान त्याने पत्नीसोबत मिळून आपल्या दोन मुलींना अन्य कुटुंबाला विकल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchinaचीनFamilyपरिवार