शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोसळत्या इमारती, अस्ताव्यस्त मृतदेह, इस्राइलच्या हल्ल्यात गाझाची राखरांगोळी, शहारे आणणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 1:10 PM

1 / 11
गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्राइलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्राइलने त्यांना चोख आणि भयंकर असं प्रत्युत्तर दिलं आहे. इस्राइलच्या हल्ल्यात गाझामधील बराचसा भाग होरपळून निघाला आहे. या हल्ल्यांनंतरच्या परिस्थितीचे शहारे आणणारे काही फोटो समोर आले आहेत.
2 / 11
हमासविरोधातील युद्ध पुढे सरकत असताना इस्राइली सैन्याने जमिनीवरील आक्रमक अधिक तीव्र केले आहे. यात इस्राइलला अमेरिकेचीही मदत मिळत आहे.
3 / 11
इस्राइलने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात शेकडो लोक मारले गेले आहेत. तसेच आपले प्राण वाचवण्यासाठी गाझामधील लोकांकडून पळापळ सुरू आहे. मुलांना कडेवर घेऊन इकडे तिकडे पळताना लोक दिसत आहेत.
4 / 11
गाझापट्टीवर करण्यात आलेल्या बॉम्बफेकीमध्ये एक इमारत कोसळली आहे. तिथे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या एका कुत्र्याच्या मृतदेहाकडे खिन्नपणे पाहत बसलेला एक मुलगा.
5 / 11
गाझापट्टीमधून समोर येत असलेले चित्र भयावह आहे. तेथील लोक तहान-भुकेने व्याकूळ झालेले आहे. पुरवठा ठप्प झाल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये तिथे खाण्यापिण्याच्या वस्तूंची टंचाई निर्माण होऊ शकते.
6 / 11
गाझापट्टीमध्ये आपल्या नातेवाईकांना गमावण्याचं दु:ख लोकांच्या डोळ्यात दिसत आहे. प्रत्येक कुटुंब आपल्या जवळच्या लोकांना गमावत आहे. या हल्ल्यातून वाचलेले लोक एकमेकांना धीर देत आहेत.
7 / 11
इस्राइलने सांगितले की, त्यांच्या लढाऊ विमानांनी गाझा सिटीच्या आसपास २०० हून अधिक ठिकाणी हल्ला केला. या भागातूनच हमासने इस्राइलवर हल्ला करण्यास सुरुवात केली होती.
8 / 11
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गर्दीचा भाग असलेल्या किनारी भागामध्ये सुमारे ९०० लोक मारले गेले आहेत. तसेच ४ हजार ६०० लोक जखमी झाले आहेत.
9 / 11
इस्राइलचे संरक्षणमंत्री योव गँलेंट यांनी गाझा बॉर्डरजवळ सैनिकांशी चर्चा केली. यावेळी हमासला बदल हवा होता आणि त्याला बदल भेटेल, असं त्यांनी सांगितलं.
10 / 11
इस्राइलच्या विध्वंसक हल्ल्यामध्ये मोठमोठ्या इमारती क्षणार्धात भुईसपाट होत आहेत.
11 / 11
इस्राइलच्या हल्ल्यानंतर गाझा शहर अलर्ट मोडवर आहे. तसेच तिथे रॉकेट हल्ल्यांचा इशारा देणारे सायरन सातत्याने वाजत आहेत.
टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षTerrorismदहशतवाद