अमेरिका, वेनेझुएला, फ्रान्स आणि नेदरलँडला 'इरमा' वादळाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 18:36 IST2017-09-09T18:32:48+5:302017-09-09T18:36:10+5:30

अमेरिका, वेनेझुएला, फ्रान्स आणि नेदरलँड या चार देशांना इरमा वादळाने जोरदार तडाखा दिला आहे.

इरमा वादळामुळे वेनेझुएला, नेदरलँड, फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झालं.

कॅटगरी पाचमध्ये येणारे हे वादळ धडकले तेव्हा वाऱ्याचा ताशी वेग 260 किलोमीटर होता. क्युबाला धडकल्यानंतर हे वादळ अमेरिकेच्या फ्लोरिडाकडे वळलं.

कॅरेबियन बेटावर 19 जणांचा मृत्यू झाला असून, हजारो घरांचे नुकसान झाले आहे. फ्रान्समध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, सात जण बेपत्ता आहेत.