शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२४ तासांपूर्वी थोडक्यात बचावलं 'Space station'; तुकडे होऊन पृथ्वीवर पडणार होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 4:07 PM

1 / 11
२४ ऑगस्ट २०२३ रोजी, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) थोडक्यात बचावले. मोठया प्रमाणात अंतराळातील कचरा त्याच्या दिशेने अत्यंत वेगात येत होता. हे टाळण्यासाठी स्पेस स्टेशनमध्ये बसवण्यात आलेले रशियन मॉड्यूलचे इंजिन आणि थ्रस्टर्स २१.५ सेकंदांसाठी चालू केले गेले. नासानेही याला दुजोरा दिला आहे.
2 / 11
नासाने आपल्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन Zveda सर्व्हिस मॉड्यूलचे इंजिन २१.५ सेकंदांसाठी चालू केले होते. जेणेकरून संपूर्ण अंतराळ स्थानक त्याच्या कक्षेत येणाऱ्या कचऱ्यापासून वाचवता येईल. अंतराळ स्थानक सुमारे १६४० फूट खाली टाकण्यात आले. सहसा ते ४०० किमीच्या कक्षेत फिरते.
3 / 11
१९९९ पासून अंतराळ स्थानकाच्या दिशेत आणि उंचीमध्ये ३० हून अधिक सुधारणा केल्या गेल्या आहेत. म्हणजेच, त्याला वर आणि खाली केले गेले आहे. जेणेकरून अंतराळातील कचऱ्यापासून त्याला वाचवता येईल. तसे, २४ वर्षांपासून अंतराळातील वैज्ञानिकांची प्रयोगशाळा असलेले स्पेस स्टेशन २०३० मध्ये काम करणे थांबवेल. वर्षभरात ते पॅसिफिक महासागरात पाडले जाईल.
4 / 11
स्पेस स्टेशनचे आयुष्य आता फक्त ७ वर्षे उरले आहे. फक्त ते चालवलं जात आहे. हे अंतराळ स्थानक ८ वर्षांनंतर काम करणे थांबवणार असल्याची घोषणा नासाने गेल्या वर्षी केली होती. २०३० मध्ये अंतराळवीर येथून निघून जातील. २०३१ पर्यंत ते प्रशांत महासागरातील काही दुर्गम निर्जन भागात पाडले जाईल.
5 / 11
हे स्पेस स्टेशन १९९८ मध्ये लाँन्च करण्यात आले होते. तेव्हापासून ते दररोज पृथ्वीच्या १६ प्रदक्षिणा घालते. डिसेंबर २०२० पर्यंत एकूण १३१, ४४० फेऱ्या केल्या आहेत. याचा फिरण्याचा वेगही भयंकर आहे. ते एका सेकंदात ७.६६ किमी अंतर कापते. म्हणजेच ताशी २७,६०० किलोमीटरचा वेग. ४.४४ लाख किलो वजनाच्या अंतराळ स्पेस स्टेशनची रुंदी ३५७.५ फूट आणि लांबी २३९.४ फूट आहे.
6 / 11
जानेवारी २०३१ मध्ये पॅसिफिक महासागरातील पॉइंट निमो येथे ते उतरवण्याचा NASA चा प्लॅन आहे. जेणेकरून ते जमिनीपासून सुमारे २७०० किलोमीटर अंतरावर समुद्रात पडेल. याच ठिकाणी त्याची खूण बांधली जाईल. ही जागा जुने स्पेस स्टेशन, जुने उपग्रह आणि इतर अवकाशातील ढिगाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आली आहे.
7 / 11
पॉइंट निमोच्या आसपास कोणत्याही जहाजाला प्रवेश करण्यास बंदी आहे. ना हवेत ना पाण्यात. आजूबाजूला राहण्यायोग्य जागा नाही. येथे मानवी हालचाली होत नाही. कोणतीही मानवी वस्ती येथून किमान २७०० किलोमीटर अंतरावर आढळते.
8 / 11
हे स्पेस स्टेशन पाडण्यापूर्वी ISS त्यातून आवश्यक कामाच्या गोष्टी बाजूला काढणार आहे. त्यांना खासगी क्षेत्रातील अंतराळ स्थानकात नेले जाईल. अंतराळ स्थानक पडेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. या कामासाठी सुमारे १.३ अब्ज डॉलर्स म्हणजेच ९७,११६,६३०,००० कोटी रुपये खर्च केले जातील.
9 / 11
अमेरिकन फुटबॉल मैदानाएवढा आकार असलेलं हे स्पेस स्टेशन दर दीड तासाने पृथ्वीभोवती फिरते. नोव्हेंबर २००० पासून ते सतत अंतराळवीरांसाठी घर बनले आहे. येथे नेहमी ७ ते ८ अंतराळवीर असतात. खरं तर, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक केवळ १५ वर्षे काम करण्यासाठी बांधण्यात आले होते. मात्र पडताळणीनंतर ते आणखी काही वर्षे काम करू शकते असं आढळले.
10 / 11
ज्या देशांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची निर्मिती केली आहे आणि सध्या त्यावर काम करणारे देश ज्यात युनायटेड स्टेट्स, रशिया, जपान, कॅनडा, ब्राझील, यूके, स्वित्झर्लंड, स्वीडन, स्पेन, नॉर्वे, नेदरलँड्स, इटली, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क आणि बेल्जियम यांचा समावेश आहे.
11 / 11
डिसेंबर २०२१ पर्यंत १९ देशांतील सुमारे २५१ अंतराळवीर येथे गेले आहेत. तिथे मुक्काम केला आहे. अमेरिकेतील १५५ अंतराळवीर, रशियाचे ५२, जपानचे ११, कॅनडाचे ८, इटलीचे ५, फ्रान्स-जर्मनीतील प्रत्येकी चार आणि इतर देशांतील प्रत्येकी एक असे अंतराळवीर अंतराळ स्थानकावर गेले आहेत. मलेशिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती, ग्रेट ब्रिटन, कझाकिस्तान या देशांचाही यात समावेश आहे.
टॅग्स :NASAनासा