शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातल्या 'या' तीन देशांत भारताच्या चलनाला मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 9:23 PM

1 / 5
भारत ही जगातील एक शक्तिशाली आणि मजबूत अर्थव्यवस्था आहे. जगात असे अनेक देश आहेत ज्यांचं चलन भारताच्या रुपयाच्या तुलनेत जास्त किमतीचं आहे.
2 / 5
जगात असेही देश आहेत, ज्यांचं चलन भारताच्या चलनाहून कमी आहे. जगभरातल्या काही देशात भारताच्या रुपयालाही जास्त मागणी आहे.
3 / 5
झिम्बॉब्वे हा जगातील पहिला असा देश आहे जिथे भारताच्या रुपयाला मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. झिम्बॉब्वेकडे स्वतःचं असं कोणतंही चलन नाही. झिम्बाब्वे आपला जास्त करून व्यवहार हा भारताच्या चलनानं करतो.
4 / 5
इराण हा जगातील दुसरा असा देश आहे जिथे भारताच्या रुपयाला मागणी आहे. इराण आणि भारताचे द्विपक्षीय संबंध हे बऱ्याच काळापासून मजबूत राहिले आहेत. इराणकडून भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो. त्यामुळेच इराणमध्ये भारताचा रुपया मोठ्या प्रमाणात चालतो.
5 / 5
नेपाळ हा जगातील तिसरा असा देश आहे, जिथे भारताचा रुपया जास्त प्रमाणात वापरला जातो. चहूबाजूंनी पर्वतांनी वेढलेला नेपाळ हा सुंदर देश आहे. इथे दरवर्षी हजारो पर्यंटक फिरण्यासाठी येतात. भारतीय रुपयानं नेपाळमध्ये सामान सहज खरेदी करता येते.
टॅग्स :Indiaभारत