शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:01 IST

1 / 8
India-Afghanistan Relation : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकची अवस्था खूप बिकट झाली आहे. एकीकडे, कर्ज आणि पाण्याची कमतरता पाकिस्तानसाठी समस्या बनत आहेत, तर दुसरीकडे भारत आणि अफगाणिस्तानमधील वाढती मैत्री पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची डोकेदुखी वाढवत आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला असून, ते याप्रकरणी भारतासोबत उभे असल्याचे दिसून येते.
2 / 8
एकीकडे अफगाणिस्तान भारताला पाठिंबा देत आहे, तर दुसरीकडे भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही काळापासून तालिबान सरकार भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढवत आहे. गेल्या 5 महिन्यांत दोन्ही देशांनी 3 पेक्षा जास्त वेळा चर्चा केली आहे. अफगाणिस्तान आणि भारतमधील जवळीकतेमुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढणार आहे.
3 / 8
5 महिन्यांत तीन चर्चा- परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 15 मे रोजी सोशल मीडिया हँडल एक्सवर माहिती दिली की, त्यांनी भारत-पाक तणावानंतर तालिबानी सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात अफगाणिस्तान कोणत्या दिशेने उभा आहे, हे परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी केलेला निषेध, हे मी कौतुकास्पद मानतो.
4 / 8
यासोबतच, जयशंकर यांनी भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध बिघडवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांच्या मुद्द्यावर तालिबान सरकारच्या भूमिकेचे कौतुक केले. पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी त्याकडे लक्ष वेधले आणि म्हणाले, खोट्या आणि निराधार वृत्तांद्वारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अफगाणिस्तानने स्पष्पटपणे नाकारल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. अफगाणिस्तानातील लोकांशी असलेली आमची पारंपारिक मैत्री आणि विकास सहकार्यासाठी एकमेकांशी असलेले आमचे सततचे सहकार्य यावरही प्रकाश टाकण्यात आला.
5 / 8
पहलगाम हल्ल्यानंतर चर्चेचा दुसरा टप्पा-गेल्या पाच महिन्यांत भारत आणि अफगाणिस्तानमधील चर्चेचा दुसरा टप्पा 27 एप्रिल रोजी पार पडला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमधील ही पहिलीच बैठक होती.
6 / 8
भारताचे प्रवक्ते आनंद प्रकाश यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली आणि राजकीय आणि व्यापारी मुद्द्यांवर चर्चा केली. ही बैठक अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाली. त्यांच्या चर्चेत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय राजकीय संबंध मजबूत करण्यावर आणि व्यापार आणि सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाली.
7 / 8
पहिली चर्चा दुबईमध्ये झाली-जानेवारी महिन्यात दुबईमध्ये अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात एक उच्चस्तरीय बैठक झाली. भारताच्या वतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या बैठकीला हजेरी लावली, तर अफगाणिस्तानच्या वतीने तालिबान सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्तकी उपस्थित होते.
8 / 8
दुबईतील बैठकीचा अजेंडा दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांना चालना देणे हा होता, ज्यामध्ये मानवतावादी मदतीपासून ते क्रीडा, सांस्कृतिक संबंध, प्रादेशिक सुरक्षा आणि राष्ट्रीय हिताचे प्रकल्प यांचा समावेश होता.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर