शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'या' देशात रविवारी काम करणे गुन्हा, नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 17:21 IST

1 / 5
पॅसिफिक महासागरातील टोंगा हा देश एका अनोख्या कायद्यामुळे चर्चेत आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये रविवार हा केवळ सुट्टीचा दिवस मानला जातो. मात्र, टोंगामध्ये या दिवशी काम करणे हा चक्क कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला आहे. टोंगन संविधानानुसार, रविवार हा अत्यंत पवित्र दिवस असून या दिवशी काम करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली.
2 / 5
टोंगाच्या राज्यघटनेत रविवारी पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे. या दिवशी दुकान, कार्यालय किंवा ऑफिस बंद ठेवली जातात. हा केवळ एक सामाजिक नियम नसून तो एक घटनात्मक कायदा आहे, ज्याची अंमलबजावणी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून काटेकोरपणे केली जाते. जर एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी काम करताना आढळली, तर त्याच्यावर कारवाई केली जाते.
3 / 5
टोंगामध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी आहे. ख्रिश्चन परंपरेनुसार, रविवार हा प्रार्थना आणि विश्रांतीचा दिवस मानला जातो. याच श्रद्धेला कायदेशीर स्वरूप देत, रविवारी नागरिकांनी केवळ चर्चमध्ये जावे आणि कुटुंबासोबत वेळ घालवावा, या उद्देशाने हा नियम लागू करण्यात आला आहे.
4 / 5
हा कायदा अत्यंत कठोर असला, तरी जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून काही सेवांना यातून वगळण्यात आले आहे, ज्यात वैद्यकीय सेवा, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा आणि सार्वजनिक सुविधा (वीज, पाणीपुरवठा आणि इतर अत्यावश्यक सरकारी कामे) यांचा समावेश होतो.
5 / 5
जर्मनी किंवा पोलंड यांसारख्या युरोपीय देशांमध्येही रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे नियम आहेत. मात्र, तिथे टोंगाप्रमाणे तुरुंगवासाची कडक तरतूद नाही. भारतासारख्या लोकशाही देशात रविवार ही सार्वजनिक सुट्टी असली, तरी या दिवशी काम करणे बेकायदेशीर मानले जात नाही. याउलट, टोंगाची ही व्यवस्था धार्मिक परंपरा आणि आधुनिक कायदे यांचा एक अनोखा संगम दर्शवते.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय