शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 3:42 PM

1 / 10
चीन एकीकडे भारताला घेरण्यासाठी लडाख आणि सिक्किममध्ये दादागिरी करत असताना तिकडे काही महिन्यांपूर्वी ताब्यात घेतलेल्या हाँगकाँगने मोठा झटका दिला आहे.
2 / 10
चीनविरोधात हाँगकाँगमध्ये हिंसक आंदोलनांवर चीनने सुरक्षा कायदा संसदेत मांडला आहे. यावर हाँगकाँगमध्ये आगडोंब उसळला आहे.
3 / 10
चीनची ही दादागिरी हाँगकाँग किंवा तैवानलाच सहन करावी लागत नसून ती भारतालाही सहन करावी लागत आहे. गेल्या काही काळात भारतीय भूभागावर चीनी सैन्याने घुसखोरी केली होती. आज तर तीनशे सैनिक तैनात केले असून तंबूही ठोकल्याचे समजत आहे. याचबरोबर त्या भागातील रस्ते बांधणीही रोखण्याच्या मनुसब्यात चीनी सैनिक आले आहेत.
4 / 10
शिन्हुआने सांगितले की, चीनी संसदेमध्ये कामकाज सुरु होण्याआधीच्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेसाठी हाँगकाँगमध्ये विशेष प्रशासनिक व्यवस्था, कायदा लागू करणे आणि तेथे सरकारची यंत्रणा लागू करण्यासाठी विधेयकाला अजेंड्यावर ठेवण्यात आले आहे.
5 / 10
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार या कायद्याद्वारे परकीय राष्ट्रा्ंचा हस्तक्षेप, दहशतवाद आणि देशद्रोही कारवायांवर प्रतिबंध लादण्यात येणार आहेत. यामध्ये सरकार पाडण्याच्या प्रयत्नांनाही आणण्य़ात आले आहे.
6 / 10
एक देश, दोन यंत्रणा यानुसार १९९७ ला हाँगकाँग चीनच्या ताब्यात गेला होता. याद्वारे हाँगकाँगला विशेष अधिकार मिळाले आहेत. यामध्ये न्यायव्यवस्था आणि नागरिकांना स्वातंत्र्याचे अधिकार आहे. ही व्यवस्था २०४७ पर्यंत कायम राहणार आहे.
7 / 10
चीनच्या राष्ट्रगीतावरून वाद सुरु झाला. हाँगकाँगच्या विधान परिषदेमध्ये यावर विधेयक आणल्याने वाद झाला. लोकशाहीचे समर्थक सदस्यांनी याला विरोध केला. त्यांना जबरदस्तीने विधान परिषदेच्या बाहेर काढण्यात आले. या विधेयकामुळे चीनी राष्ट्रगीताचा अपमान करणे गुन्हा समजले जाणार आहे.
8 / 10
यानंतर हाँगकाँगमध्ये आंदोलने होऊ लागली. पण चीनने सैन्य घुसवत येनकेन प्रकारे आंदोलन हिंसक पद्धतीने दडपले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. यास हाँगकाँग सरकारचा चीनला पाठिंबा होता. हा आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरुच आहे.
9 / 10
आज हाँगकाँगच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार तसेच अश्रूगोळे फेकले. यामुळे पुन्हा आंदोलक हिंसक झाले आहेत.
10 / 10
आंदोलकांनी आमच्या काळातील क्रांती, स्वतंत्र हाँगकाँग, असे फलक घेतले होते. स्वातंत्र्यासाठी लढा, हाँगकाँगसोबत उभे, असेही फलक होते.
टॅग्स :chinaचीनladakhलडाख